spot_img

“टक्कल” पाडणाऱ्या व्हायरसविरोधात काय लढविणार शक्कल??

आरोग्य विभागाची टीम शेगाव तालुक्यात दाखल

बुलढाणा, 8 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) :- शेगाव (जि. बुलढाणा) तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसांतच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. याप्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे. ही स

मस्या नेमकी कशाने उद्भवत आहे, ही बाब अद्याप अस्पष्ट आहे.
शेगांव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावात अज्ञात कारणांमुळे केस गळतीच्या आजाराने थैमान घातले आहे. अनेक कुटुंबांतील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत. अगोदर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसर्‍या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांत तिन्ही गावांतील शेकडो नागरिकांची केस गळती झाली आहे. त्यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे. हा प्रकार होऊनही आरोग्य विभाग अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागरिक खासगीत उपचार घेत आहेत. शाम्पूने असा प्रकार घडत असावा, असे 

डॉक्टरांचे मत असले तरी कधीही आयुष्यात  “शाम्पू” न वापरणार्‍या नागरिकांचेही केस जात असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

  टक्कल व्हायरसच्या बाबत काय म्हणाले डीएच ओ डॉ.अमोल गिते
गुड इव्हिनिंग सिटीने याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गिते यांच्याशी संपर्क साधला असता डॉ. गिते म्हणाले की, सदर गावांमध्ये आम्ही आमचे एक टीम रवाना केली आहे. यामध्ये शेगाव तालुक्यातील तीन गावांचा समावेश आहे. त्यामध्ये बोंडगाव, कालवड, हिंगणा ही गावे आहेत. साथरोग अधिकारी आणि त्यांच्यासोबत एक त्वचारोग तज्ञांचा

 समावेश आहे. ते जाऊन याबाबत तपासणी करणार आहे. पण प्राथमिक माहितीनुसार तीन शक्यता वर्तविण्यात आल्या आहे.
फंगल इनफेक्शनची शक्यता असू शकते. कारण फंगल इनफेक्शनमुळे टक्कल पडू शकते.गावामधी पाण्यामध्ये काही वेगळया पध्दतीचे व्हायरसेस किंवा काही झाले असेल ते पाणी डोक्यावर घेतल्याने टक्कल पडू शकते.
त्या गावामध्ये एक-दोन दिवस आधी  “शाम्पू” विकण्यासाठी एक व्यक्ती आला होता. तो सांगत होता की हा  “शाम्पू” लावल्यामुळे केस घनदाट होऊ शकतात. अशी माहिती मिळाली आहे. त्या अनुशंगाने ज्या लोकांनी  “शाम्पू” विकत घेतली आहे. त्यांचे केस गळतात. याची चौकशी करण्यात येणार आहे. अशा तीन शक्यता असू शकतात. पण सर्व गोष्टी विचारात घेऊन त्या ठिकाणी उपचार करण्यात येणार आहे.
नागरिकांनी यामुळे घाबरून जाऊ नाही. कारण केस हा बाह्य भाग आहे. केसांमुळे जीव जाऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी अफावांवर विश्‍वास ठेवू नका असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गिते यांनी केले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत