spot_img

नोकरीच्या नावाखाली 62 जणांची फसवणूक : गवळी कुटुंबाने सुमारे 2 कोटींनी गंडविले

नोकरीच्या नावाखाली 62 जणांची फसवणूक : गवळी कुटुंबाने सुमारे 2 कोटींनी गंडविले

बुलढाणा, 10 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी / रणजितसिंग राजपूत ) : नोकरीच्या नावाखाली एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 62 जणांना सफाईदारपणे फसवल्याची घटना बुलढाणा शहरात घडली आहे. एकता नगर मधील गवळी कुटुंबीयांनी हे ठगबाजी केली असून मुख्य आरोपी निलेश विजय गवळीसह त्याची पत्नी, वडील आणि चुलत भाऊ यांनी मिळून सुमारे 1 कोटी 96 लक्ष 67 हजार रुपयांनी गंडा घातला आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या फसवणूक प्रकरणांमध्ये बुलढाणा शहर पोलिसांनी गवळी कुटुंबातील चार जणांना आरोपी केले असून विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

ठकबाजीच्या या प्रकरणांमध्ये ठगवले गेलेले पीडित आरोपी गवळींचे अधिक तर नातेवाईक आहेत. यात मुख्य फिर्यादी विश्वनाथ जगन्नाथ गव्हाणे, गणेश सुधाकर जाधव, अमोल सिताराम गावंडे हर्षल संजय काळवाघे आणि अलका मधुकर साबळे आहेत. यांच्यासह एकूण 62 जणांना निलेश विजय गवळी वय 31 रा. ढालसावंगी, त्याची पत्नी कोमल निलेश गवळी वय 29 रा. एकता नगर, बाप विजय नामदेव गवळी वय 57 रा. एकता नगर आणि अंकुश कृष्णा गवळी वय 37 रा. एकता नगर बुलढाणा यांनी एकूण 62 जणांना सन 2019 ते पाच नोव्हेंबर 2024 या कालावधीत नोकरी लावून देतो नोकरीचे आम्ही दाखवून नोकरीची खोटी जाहिरात परिपत्रक दाखवून व नेमणुकीचे बनावटी आदेश तयार करून खोटी व बनावट प्रतीक्षा यादी दाखवून मंत्रालयातील अधिकाऱ्यांचे खोटे शिक्के तयार करून या सर्वांकडून वेळोवेळी फोन पे, चेक द्वारे आणि नगदी असे एकूण एक कोटी 96 लक्ष 67 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. आरोपी गवळी कुटुंबीयांविरोधात बुलढाणा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 318 (4 ), 316 (2), 336(3), 338, 340 (2) आणि 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मोरे करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागात कनिष्ठ लिपिक पदावर मंत्रालय विशेष बाब अधिकारांतर्गत नोकरी लावून देतो, सिंधुदुर्गतील कणकवली मध्ये आरोग्य सेवक पदभर्ती तर कधी अशाच विविध कार्यालयांच्या खोट्या पदभरती दाखवत निलेश गवळीने पत्नी चुलत भाऊ आणि वडिलांच्या सहभागाने फसवणूक करत राहिले. विशेष म्हणजे गवळी कुटुंबियांनी मंत्रालयातील सचिव कक्ष अधिकारी यांचे खोटे आणि बनावट शिक्केही बनवले होते, असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे. वरील पाच जणांव्यतिरिक्त उर्वरित 57 जणांची यादी ही गुड इव्हिनिंग सिटीकडे आहे, ज्यांची दोन कोटी रुपयांनी फसवणूक झाली आहे. पैसे देऊनही नोकरीचा आदेश का मिळत नाही अशी विचारणा केल्यावर आरोपी गवळी पीडित युवकांना मुंबई मंत्रालयातून फिरवून आणायचे. आपण फसविले गेल्याचे खूप उशिरा या सर्वांच्या लक्षात आले.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत