spot_img

जिजाऊ माँ साहेबांना अभिवादन करण्यासाठी अवघे या!

उद्या पत्रकार भवन येथे कार्यक्रम ; शहर पत्रकार संघाचा पुढाकार… 

बुलढाणा : स्वराज्य संकल्पक राजमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा येथील पत्रकार भवनात ‘अभिवादन माँ साहेबांना ‘ या कार्यक्रमाचे आयोजन उद्या १२ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी पत्रकार तथा तमाम नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे. 

जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माँ साहेब जिजाऊ यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी डॉ. वैशाली निकम यांचे व्याख्यान होणार असून, कार्यक्रमासाठी बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे, सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले, दैनिक महाभुमिचे कार्यकारी संपादक ब्रह्मानंद जाधव, अजिंक्य भारतचे पत्रकार गणेश निकम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमासाठी सर्व जिजाऊ प्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन शहर पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत