70 ते 80 लाखाचे नुकसान..
बुलढाणा, 20 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी ): मलकापुर- बुलढाणा रस्तावरील वाकोडी हद्दीतील सानिया मोटार गॅरेजला 19 जानेवारीच्या मध्यरात्री 3 ते 4 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास दुरुस्ती साठी आलेल्या 13 ते 14 चारचाकी वाहने, स्पअर पार्ट व गॅरेज मधील साहित्य जळून खाक झालीये, आगीत 70 ते 80 लाखाचा नुकसान झाल्याची माहिती गॅरेज मालक शेख इरफान यांनी दिली आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या समोर येऊ शकले नाही. पण शॉर्ट सर्किटचा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान मलकापूर तहसीलदार राहुल तायडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.सानिया मोटार गॅरेज हे शेख इरफान यांच्या मालकीची आहे. आग लागल्याचे समजताच परिसरातील अनेकांनी आपापल्या परीने आग विझाविण्याचा प्रयत्न केला.