spot_img

बुलेटमधून फटाकड्या फोडणाऱ्यांना दंडाचा फटका : 4 बुलेटवाल्यांकडून 78 हजार वसुल

बुलढाणा, 20 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी): फाडफाड आवाज करत बुलेटमधून फटाकड्या फोडण्याचे प्रकार अलिकडच्या काळात वाढले आहेत. याचा आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. विशेषत: लहान मुले तसेच वृद्ध आणि महिलांनाही हा त्रास सहन करावा लागतो. रात्री-अपरात्री फटाके वाजल्याप्रमाणे हे सायलेन्सर आवाज काढतात. मूळ बुलेटचे सायलेन्सर बदलून तसेच गाडीचे मॉडिफिकेशन करून अनेक दुचाकीधारक अशाप्रकारचे फटाक्यांचा आवाज करणारे सायलेन्सर बसवतात. या वाहनधारकांनी शहरात उच्छाद मांडला आहे. उत्सवाच्या प्रसंगी तर त्यांना अधिकच चेव येतो, अशा तक्रारी नागरिक करीत आहेत. त्यानंतर आता ठाणेदार नरेंद्र ठाकरे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. आज, 20 जानेवारी रोजी अशा चार बुलेट धारकांविरोधात कारवाई करत त्यांना एकूण 78 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बुलेट मॉडीफाय करताना आरटीओ विभागाची परवानगी न घेता कर्णकर्कश सायलेन्सर लावल्या प्रकरणी चार बुलेट जप्त करून पोलीस स्टेशन मध्ये आणला गेल्या. त्यानंतर एका बुलेटधारकाला 18 हजार, दुसऱ्याला 10 हजार 500, तिसरा
26 हजार आणि चौथ्या बुलेटधारकाला
23 हजार पाचशे रुपये दंड भरण्याचे फर्मान आरटीओ यांनी सोडले. पोलिसांच्या या पुढाकाराला आरटीओ विभागाचे सहकार्य मिळाले आहे. सदर कार्यवाही ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनामध्ये वाहतूक पोलीस कर्मचारी किनगे आणि श्री कुवारे यांनी केली.
“कर्णकर्कश सायलेन्सर लावून फिरणाऱ्या बुलेट धारकांच्या विरोधात कार्यवाहीचे सत्र सुरूच राहील परंतु जे गॅरेज वाले किंवा दुकानदार अशा प्रकारचे सायलेन्सर विकतील त्यांच्या विरोधात कडक कार्यवाही करू”, असा इशारा ठाणेदार ठाकरे यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून दिला आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत