spot_img

भाईजींचा वारसदार ठरला… लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. सुकेश झंवर आजपासून बुलढाणा अर्बनचे अध्यक्ष

बुलढाणा, 27 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः आशिया खंडातील सर्वात मोठ्या पतसंस्था असलेल्या बुलढाणा अर्बनच्या अध्यक्ष पदी डॉ.सुकेश झंवर यांची निवड करण्यात आली आहे. आज पर्यंत बुलढाणा अर्बनचे संचालक असलेले डॉ.सुकेश झंवर हे आजपासुन अध्यक्ष पदाची सुत्रे हाती घेणार आहे.अमरावती येथील मूळ रहिवासी व यवतमाळ येथे प्रथम बालरोगतज्ञ, एमबीबीएस, सीएच म्हणून वैद्यकीय व्यवसाय करणारे डॉ. ब्रिजमोहन सिताराम झंवर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सरोजताई हे प्रतिष्ठित दांपत्य सरोजताई या सामाजिक कार्याची आवड असलेल्या माहेश्वरी महिला मंडळाचे प्रेसिडेंट पद त्यांनी भूषविले. तसेच महेश पतसंस्थेच्या डायरेक्टरपदी सुद्धा विराजमान झालेल्या आहेत. सुकेशजी, मनीष व गिरीश असे त्यांचे सुपुत्र सुकेशजी यांचा जन्म 10 ऑक्टोंबर 1975 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण यवतमाळ येथील गुरुकुल ज्ञानपीठ येथे झाले. माध्यमिक शिक्षण यवतमाळ येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालय पूर्ण झाले. शालेय जीवनात सुकेशजींना अभ्यास व्यतिरिक्त खेळायची आवडही होती. क्रिकेट व बुद्धिबळ हे त्यांचे आवडते खेळ. बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांची जवाई डॉ.सुकेश झंवर यांची आज संचालक मंडळाने बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

त्यांची बुलढाणा अर्बनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांची सर्वच स्तरातून कौतुुक होत आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत