spot_img

बोथा घाटात संध्याकाळी बिबट्याचा “कॅटवॉक”

बुलढाणा, 30 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी/ रणजीतसिंग राजपूत ) : ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा घाटामध्ये आज संध्याकाळी बिबट्याचे दर्शन झाले. संध्याकाळी साडेसहा वाजे दरम्यान हा बिबट्या रुबाबात रस्त्यावरून मधोमध चालतांना गुड इव्हिनिंग सिटी च्या कॅमेरामध्ये कैद झाला आहे. बुलढाणा कडून खामगाव कडे जात असताना ज्ञानगंगा अभयारण्याच्या प्रवेशद्वारापासून बोथा घाटाकडे फक्त एक किलोमीटर अंतरावर हा गुटगुटीत बिबट्या रस्त्याच्या उजवीकडून डावीकडे तर डावीकडून उजवीकडे असा चकरा मारत होता. सुदैवाने त्याने कुठल्याही चार चाकी वाहनावर किंवा दुचाकी वाहनधारकांवर हल्ला केला नाही. परंतु वनविभागाने या बिबट्याच्या हालचालीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शांत दिसणारा बिबट्या कधी कुणावर हल्ला करेल हे सांगता येत नाही. गंभीर पाप म्हणजे ज्या ठिकाणी तपासणी नाका आहे त्या ठिकाणी या दरम्यान एकही कर्मचारी किंवा एकही वन अधिकारी हजर नव्हता. गुड इव्हिनिंग सिटीकडे याबाबत व्हिडीओ सुद्धा उपलब्ध आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत