बुलढाणा, 1 फेब्रुवारी(गुड इव्हिनिंग सिटी) ः दाभाडी येथील कथीत दरोडा प्रकरण रचणारा गजानन टेकाडे हा पशुवैद्यकीय डॉक्टर नसल्याचे महाराष्ट्र राज्य राजपत्रित पशुवैद्यक संघटनेच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. गजानन टेकाडे याच्याकडे पशुवैद्यक संघटनेचा परवाना नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ.दिवाकर काळे यांनी याबाबत प्रसिध्दी पत्रकांतून जाहीर केले की, गजानन टेकाडे हा दाभाडी ता. मोताळा परिसरात खाजगी पशुचिकित्सा करतात ते कोणत्याही परिषदेकडे पंजीकृत डॉक्टर नाहीत. तरी त्यामुळे येथून पुढे अश्याप्रकारे कोणत्याही पशुचीकीत्सा करणार्या पंजीकृत नसलेल्या व्यक्तीच्या नावापुढे पशुवैद्यकीय डॉक्टर किवा डॉक्टर हि उपाधी लावण्यात येऊ नये.
मागील 2 ते 3 आठवड्या पासून उपरोक्त गजानन टेकाडे याच्या बाबत बातमी प्रसारित होत असताना निवेदक त्याच्या नावापुढे पशुवैद्यकीय डॉक्टर किवा डॉक्टर ही लावत असलेला या उपाधीमुळे परिसरातील तसेच विभागातील पंजीकृत पशुवैदयकिय डॉक्टर यांना नाहक होत असलेल्या नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे.
डॉक्टर पदवी धारण करणे करिता किमान B.V.SC & A.H मान्यता प्राप्त विद्यापीठाची 5 वर्ष अभ्यासक्रम पूर्ण करून प्राप्त केलेली स्नातक असलेली व्यक्ती भारतीय पशुचिकित्सा परिषद कायदा 1984 (52/1984) अन्वये भारतीय पशुवैद्यक परिषद, नवी दिल्ली किवा आपल्या राज्यातील महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर यांच्याकडे पंजीकृत व्यक्ती पशुवैद्यकीय डॉक्टर किवा डॉक्टर हि उपाधी लावू शकतो असे संघटनेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाव्दारे जाहीर केले आहे. संघटनेच्यावतीने आवाहान ही करण्यात आले आहे की, परवाना असल्यावरच डॉक्टर ही उपाधी लावावी.