spot_img

बाळाच्या पोटात बाळ प्रकरणात गर्भवती महिलेची डिलीव्हरी

 

  1. कशी झाली प्रसूती ? काय झाले पुढे बाळाचे ?

बुलढाणा, 2 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः ‘आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटातही बाळ’, ही पहिली ब्रेकिंग गुड इव्हिनिंग सिटीने 28 जानेवारीच्या सकाळी 10.30 वाजेदरम्यान सर्वांना दिली होती. त्यानंतर देशभरातील मिडीयाचे लक्ष या बातमीकडे गेले होते. आता संपूर्ण देशभर गाजलेल्या बाळाच्या पोटात बाळ या प्रकरणात पुढे काय झाले ? याविषयीची ब्रेकिंगही आपणांस गुड इव्हिनिंग सिटी देत आहे. जवळपास 5 लाखांमधून एखाद्या अशा या प्रकरणात गर्भवती महिलेची प्रसूती काल, 1 फेब्रुवारीच्या रात्री झाली आहे. इतरत्र कुठेच नाही तर बुलढाणा येथील जिल्हा स्त्री रूग्णालयात चार ते पाच डॉक्टरांच्या टिमने सदर महिलेची डिलीव्हरी केली. या महिलेची प्रसूती कशी झाली, बाळाचे काय झाले ? याची उत्सुकता आपण सर्वांना असेलच. तर आनंदाची बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेची डिलीव्हरी सुरक्षीत झाली असून तिला झालेले बाळही सुखरूप असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी यांनी गुड इव्हिनिंग सिटीला दिली आहे. काल रात्री ही प्रसूती डॉक्टरांच्या देखरेखीखाली पार पडली असून बाळाला अमरावती शासकीय रूग्णालयात पुढील शस्त्रक्रियेसाठी रवाना करण्यात आले असल्याचेही डॉ. भुसारी म्हणाले.
आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ, हा धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात 26 जानेवारी रोजी एका गर्भवती महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान समोर आला होता. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. त्याहीपेक्षा मोठी गंभीर बाब म्हणजे सदर गर्भवती महिलेला नऊ महिने पूर्ण झालेल्या या महिलेची रात्री प्रसुती झाली. बाळाचे वजन 2200 ग्रॅम आहे. त्या मुलाला पुढील उपचारासाठी अमरावती येथील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे. त्या बाळाच्या पोटातील गर्भ काही दिवसानंतर काढतात की लगेच काही उपचार केल्या जातात हे स्पष्ट होईलच. स्त्री रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात डॉ. संतोष वानखेडे, डॉ. प्रशांत अग्रवाल, डॉ. सुरेखा मेहेर आणि डॉ. संजीवनी वानेरे यांच्या टिमने ही प्रसूती सुखरूपपणे पार पडली. भूलतज्ञ म्हणून डॉ. प्रविण झोपे आणि डॉ. रेणुका हिंगणे तसेच ब्रदर अमित किन्हीकर यांचेही परिश्रम कामी पडले.
सदर महिला ही घाटाखालची असून तिचे वय 32 वर्षे आहे. तिला याआधी दोन अपत्य आहेत. या आईच्या पोटात बाळ आणि बाळाच्या पोटात बाळ हा प्रकार पाहून डॉक्टरही अचंबित झाले होते मेडिकल भाषेत अशा गर्भधारणेला ’फीटस इन फीटू’ असे म्हणतात. अर्भकांमध्ये अर्भक असणे अति वेळ अशी घटना आहे यात एका अर्भकाच्या पोटामध्ये दुसरे अर्भक वाढत असते. साधारणतः पाच लाख गर्भवती महिलांमध्ये अशी केस एखादी आढळते. जगात अशी घटना 1983 मध्ये पहिल्यांदा नोंदवली गेली. त्यानंतर आतापर्यंत जागतिक स्तरावर सुद्धा 200 पेक्षा कमी केसेस अर्भकामध्ये अर्भक असल्याच्या घडल्या आहेत.

सहयोग हॉस्प्टिलमध्ये अंत्यत अल्प दरात आरोग्य तपासणीची सुविधा

General Health Check-UP

■ Complete Blood Count, Blood Group & Rh type
• Fasting & Post Prandial Blood Sugar
• Liver Function Tests (S.Billirubin/SGOT/SGPT, alkaline Phosphatase, S.Protein-Albumin Globulin, A/G Ratio)
■ Kideny Function Tests (S.Creatinine/BUN/Uric Acid)
• Lipid Profile
■ T3, T4, Ts4
■ Urine Exam
■ ECG, TMT, 2D-ECHO

Cost For Package is Rs.3000/-
तपासणी करीता सकाळी 8.30 वाजता येणे. आरोग्य तपासणी सहयोग मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ‘बोधेकर टॉवर्स’ इण्डेन गॅस एजन्सी जवळ जिल्हा सामन्य रूग्णालय बुलढाण

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत