spot_img

“ॲड.नाझेर काझींच्या समर्थनार्थ विविध पदाधिकारी मैदानात”

“कामात कुचराईमुळे अनुजाताईंचे निष्कासन”

बुलढाणा, 5 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे):- राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.नाझेर काझी, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष मनिष बोरकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सचिव निर्मलताई तायडे यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनुजाताई सावळे यांनी 15 डिसेंबरला राजीनामा दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपालीताई चाकणकर यांनी 18 डिसेंबरला अनुजाताई सावळे यांना निलंबित केल्याचे पत्र ही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. परंतू हे कालपर्यंत गुलदस्त्यात होते. पण काल अनुजाताई सावळे यांनी सोशल मिडियावर राजीनामा पत्र टाकल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहे.
  माझ्यावर केलेले आरोप धादांत खोटे आहे. अनुजा ताई सावळे यांचे हे राजीनामा नाट्य आहे. कुठल्याही पक्षात महिलांना अपमानास्पद वागणूक देत नसतात. आमचा पक्ष देखील महिलांना व इतर कार्यकर्त्यांना अपमानास्पद वागणूक देत नाही. विशेष म्हणजे अनुजा सावळे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या विरोधात काम केले. त्यांच्या माहेर असलेल्या देवखेड या गावात त्या प्रचारासाठी सुद्धा गेल्या नाहीत.
अ‍ॅड.नाझेर काझी, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस बुलढाणा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेल्या नाझेरजी काझी यांच्या नेतृत्वावर काही व्यक्तींनी केलेले आक्षेप हे पक्षविरोधी कारवायांपासून स्वतःला वाचवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न आहे.  
गेल्या विधानसभेपासून माजी जिल्हाध्यक्षा यांनी पक्षाविरोधात काम केल्याची माहिती अनेक कार्यकर्त्यांच्या कानावर होती. त्यामुळे पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई होणार, अशी चर्चा सुरू होती. ही कारवाई टाळण्यासाठीच राजीनामा आणि नेतृत्वावर आक्षेप घेण्याचे नाट्य उभे केले जात आहे.
मनिष बोरकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी , बुलडाणा

जिल्हाध्यक्ष सावळे यांच्या राजीनामागे कुठल्याच प्रकारचा जातिवाद नसून, आतापर्यंत जिल्हाध्यक्ष काजी साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन चालत आहे , ना पक्षाच्या झेंड्याखाली सर्व जाती धर्माचे लोक सक्षमतेने काम करत आहेत. जिल्हाध्यक्ष सावळे या आपलं काम कुचराईच खापर जिल्हाध्यक्ष आदरणीय काजी साहेब यांच्यावर फोडत आहेत , आतापर्यंत बर्‍याच महिला पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष सावळे यांच्या , महिलांना गैर वर्तणूक , बोलण्याची शैली, या सर्व त्रासाला कंटाळून पक्ष सोडून दुसर्‍या पक्षामध्ये गेल्या आहे.
सौ.निर्मलाताई तायडे प्रदेश सचिव, राष्ट्रवादी महिला काँग्रेस

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत