बुलढाणा, 9 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व भारतीय महिला क्रिकेट संघाची कप्तान मिताली राज आज बुलढाण्यात धर्मवीर आमदार चषकच्या अंतीम सामन्यासाठी उपस्थित राहणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘धर्मवीर आमदार चषक’ 2025 च्या क्रिकेट टूर्नामेंटच्या सेमी फायनल व फायनल मॅच करीता तसेच जिजामाता लॉन, प्रेक्षक व गॅलरी व डे-नाईट फल्ड लाईटच्या भुमिपुजन सोहळयासाठी वीरेंद्र सेहवाग व मिताली राज यांची विशेष उपस्थिती आज 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता राहणार आहे. विदर्भातील सर्वांत मोठी क्रिकेट स्पर्धा, म्हणजेच बुलढाण्यातील धर्मवीर आमदार चषक.. या स्पर्धेचे पहिले पारितोषिक असते 7 लाख 77 हजार 777 तर पुसरे पारितोषिक असते 3 लाख 33 हजार 333 रुपये, याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व मैन ऑफ द सिरीज आदी भरभक्कम बक्षीसे या स्पर्धेचे विशेष आकर्षण असते. राज्यातले व राज्य बाहेरचे मो- मोठे खेळाडू यात सामील होत असतात, तर अंतिम सामन्यासाठी भारतीय पुरुष महिला संघातील खेळाडूंची विशेष उपस्थिती असते. यावर्षी आमदार चषक 2025 बुलढाणा, या स्पर्धेचा अंतिम सामना इथे आज रविवारी, दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या अंतिम सामन्याकरिता भारतीय संघाचे तडाखेबाज फलंदाज राहून गेलेले वीरेंद्र सेहवाग व भारतीय महिला संघाच्या सेहवाग समजल्या कप्तान मिताली राज यांची विशेष उपस्थिती राहणार असून, त्यांची फटकेबाजी पाहण्याची संधी तमाम क्रिकेट रसिकांना मिळणार आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली युवानेते कुणाल गायकवाड, धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज मायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तर पवन भालेराव व विजय दुरणे तथा प्रसाद फदाट, उमेश बरडे व बाळा देशमुख, राजू पाटील, नितीन नेमाने, जीवन उबरहंडे, नितीन पाटील, विशाल खंडारे, स्वप्नील पाटील, सागर उबाळे तथा समालोचक औम सोनुने व चेतन सोनुने आदींच्या आयोजनात ही स्पर्धा सुरू झालेली असून.. नावाजलेल्या संघांचा यात सहभाग आहे. या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा सुरू आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आज रविवार 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. अंतिम सामन्यासाठी क्रिकेटप्रेमी रसिकांची प्रचंड गर्दी उसळत असते. अंतिम सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग आता भारतीय क्रिकेट संघाच्या कप्तान मिताली राज यांची प्रमुख पाहुणे म्हणून विशेष उपस्थिती लाभणार आहे. विशेष म्हणजे या दोघांना प्रत्यक्ष खेळताना जिजामाता प्रेक्षागाराच्या मैदानात क्रिकेट रसिकांना बघायला मिळागार आहे. भारतातील क्रिकेटर हे रसिकांसाठी देवा पेक्षा कमी नसतात, त्यामुळे त्यांना जवळून पाहण्याचा योग क्रिकेट रसिकांना येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी जास्तीत जास्त क्रिकेटप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन धर्मवीर आमदार चषक आयोजन समितीच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकातून करण्यात आले आहे.