spot_img

मुख्याध्यापिका सिमा वनकर यांना गाठली लाचखोरीची परिसिमा

  • 60 हजारांची लाच स्वीकारतांना रंगेहाथ अटक

बुलढाणा, 11 फेब्रुवारी (गुड इव्हिनिंग सिटी) : भोजन पुरवठ्यामध्ये वेळोवेळी मोठा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे. आज शेगांव येथे अ‍ॅन्टी करप्शन ब्यूरोच्या पथकाने एका मुख्याध्यापिकेला 60 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई आज दुपारच्या दरम्यान घडली. शेगाव येथील अनुसुचीत जाती मुलींची शासकीय निवासी शाळेच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीमती सिमा वनकर एसीबीच्या जाळ्यात रंगेहाथ अडकल्या.

अनुसुचीत जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव ता. शेगाव येथील विद्यार्थिनींना भोजन पुरवठा व दुध पुरवठा करीत आहेत. तक्रारदार यांनी भोजन पुरवठा केल्याबाबत ऑगस्ट 2024 पर्यंतचे भोजन बिले तकारदार यांना प्राप्त असुन सप्टेंबर 2024 ते जानेवारी 2025 पर्यंतचे असे एकुण 5 महिन्याचे बिले मिळाले नाहीत. तसेच डिसेंबर 2023 पासुन ते शाळा सुरू असल्याचे कालावधीतील म्हणजेच एकूण 12 महिन्याचे दुधाचे बिले अप्राप्त आहेत. भोजन व्यवस्थेबाबत कोणतीही तक्रार न करता भोजन पुरवठयाचे बिल काढण्याकरीता विद्यार्थीनींचा दैनंदिन उपस्थिती अहवाल दरमहा सहा. आयुक्त, समाज कल्याण कार्यालय बुलढाणा येथे सादर केल्याबाबतचा मोबदला म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सिमा वनकर हया 2 लाख 10 हजार रूपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबत तकार प्राप्त झाली होती.

त्यानुसार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी लाचमागणी पडताळणी कार्यवाही आयोजीत केली असता, प्र.मुख्याध्यापिका श्रीमती सिमा वनकर यांनी तक्रारदार यांना भोजन बिलाचे प्रतीमाह 30 हजार रूपये याप्रमाणे 5 महिन्याचे एकुण 1 लाख 50 हजार रूपये व दुध पुरवठा बिलाचे प्रतीमाह 5 हजार रू. प्रमाणे 12 महिन्याचे 60 हजार रू. असे एकुण 2 लाख 10 हजार रू. लाचेची मागणी करुन भोजन बिलाच्या लाचेचा पहीला हप्ता म्हणून 60 हजार रुपये दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी तसेच उर्वरीत लाच रक्कम बिले प्राप्त झाल्यानंतर स्विकारण्यास संमती दर्शविली. त्यावरुन दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजीत सापळा कारवाई दरम्यान श्रीमती सिमा प्रभाकर वनकर, पद सहा. शिक्षीका, अति. पदभार मुख्याध्यापक वय 54 वर्ष, अनुसुचीत जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव जि. बुलढाणा यांनी तक्रारदार यांच्याकडुन भोजन बिलाच्या 2 महिन्याचा पहीला हप्ता 60 हजार रुपये स्विकारून लोकसेवक या नात्याने गैरमार्गाने कर्तव्य पार पाडल्याचा मोबदल्याच्या स्वरुपात स्वतःचा आर्थिक गैरलाभ करुन घेतला त्यावरून लोकसेविका यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुध्द पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया चालु आहे. सदर कार्यवाही अधिकारी श्रीमती शितल घोगरे, पोलीस उपअधिक्षक, अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा, सापळा पथक पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोहेकॉ. प्रविण बैरागी, राजेंद्र क्षिरसागर, पोना विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोकॉ. रंजित व्यवहारे, मपोकॉ. स्वाती वाणी, चानापोकाँ. नितीन शेटे, अरशद शेख, अँटी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांनी पार पाडली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत