spot_img

“त्याने” अफूची शेतीच पेरली…अंढेऱ्यात 12 कोटींची अफू हस्तगत

◾एलसीबीच्या जांबाज टीमची कारवाई

बुलढाणा, 22 फेब्रुवारी ( गुड इव्हिनिंग सिटी/रणजितसिंग राजपूत ) : आपल्याकडे काही ठिकाणी गांजाची शेती आढळली आहे. पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. पण काही भामट्यांनी अफूच्या शेतीकडे पण आपला मोर्चा वळविला असल्याचे दिसते. अर्थात ही शेती भरून त्याचा माल बाहेर बाजारात जाण्यापूर्वीच पोलिसांनी पीक हस्तगत केले. अंढेरा शिवारात अफूच्या शेतीची सर्वात मोठी कारवाई अंढेरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आली आहे. सदरची कारवाई ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजते. अंढेरा शिवारात आज 22 फेब्रुवारी रोजी 15 क्विंटल 72 किलो अफू पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याची किंमत 12 कोटी 60 लाख 28 हजार रुपये आहे. पो. स्टे. अंढेरा हद्दीत अवैधरित्या विनापरवानगी स्वतःचे शेतात अंमली पदार्थ अफूची शेती, संगोपन, करून बाळगतांना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून 15 क्विंटल 72 किलो अफू का
किंमत 12 कोटी 60 लाख 28 हजार व आरोपी संतोष मधुकर सानप वय 49 वर्ष, रा. अंढेरा याला अंढेरा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्या वर कलम 8 क, 18क NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे , अशोक थोरात अपर पोलीस अधीक्षक खामगाव व बी. बी. महामुनी अपर पो. अधीक्षक बुलढाणा, मनीषा कदम उपविपोअ देऊगाव राजा यांचे मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक लांडे, Api आशिष रोही. सपोनि रुपेश शक्करगे, PSI सचिन कानडे, PSI प्रताप बाजड, पोहेका. दीपक लेकुरवाले, म. पोहेका वनिता शिंगणे, Hc शेख चांद, Hc पुरुषोत्तम आघाव,Hc राजेंद्र टेकाळे, HC दिनेश बकाले , HC गणेश पाटील,, Hc सतीश हाताळकर, HC अनुपकुमार मेहेर,, Npc विजय वारुळे, Npc युवराज राठोड, Npc विजय पैठणे, Pc मंगेश सनगाळे, Pc दीपक वायाळ, Pc भारत जाधव, HC शिवानंद मुंढे, Hc समाधान टेकाळे, Npc सुरेश भिसे, Pc विलास भोसले यांनी पार पाडली.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत