spot_img

सोन्याची चैन चोरणारा चोरटा अटक

बुलढाणा, 2 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : सोन्याची चैन चोरणारा आरोपी निशांत  याला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे.
हॉटेलवर जेवण करून परत येत असताना, तब्बल दीड तोळ्याची सोन्याची चैन दूचाकीस्वाराने चोरल्याची घटना त्रिशरण चौकात घडली होती. सुमित वसंत अंभोरे रा. तार कॉलनी सुंदरखेड बुलढाणा हा 20 फेब्रुवारी रोजी आते भाऊ महेंद्र किशोर मोरे राहणार एकता नगर बुलढाणा हे चिखली रोडवरील वसंत हॉटेल येथे रात्री आठ वाजताच्या सुमारास जेवण करायला गेले होते. दरम्यान स्कुटीने घरी परतत असताना चांडक लेआउट येथे पाठीमागून बजाज पल्सर या दुचाकीवर दोन अनोळखी इसम आले व म्हणाले की, आमच्या गाडीला टक्कर दिली. या कारणावरून ते दोघेही स्कुटीच्या मागे लागले. रात्री साडेअकरा वाजता च्या दरम्यान त्रिशरण चौक येथे खामगाव रोडने वळण घेत असताना, स्कूटीचे चाक खड्यात गेल्याने तक्रारदार खाली पडला. दरम्यान पाठीमागे लागलेल्या अज्ञात 2 व्यक्तींनी सुमित वसंत अंभोरे याच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून घेतली व मलकापूर मार्गाने बजाज पल्सर या दूचाकीने पळ काढला अशा स्वरूपाची तक्रार बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला दाखल होती.
त्या अनुषंगाने ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपी निशांत  वय 32 वर्षे रा  बुलढाणा याचा शोध घेऊन त्याला बुलढाणा शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दीड तोळ्याची सोन्याची चैन किंमती 90हजार रूपये, आरोपीची मोटारसायकल किमत 70 हजार रूपये असे त्याच्याकडून 1 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस उपनिरिक्षक रवि मोरे , पोहेका संदीप कायंदे , महिला हेकॉ सुनीता खंडारे, पोका युवराज शिंदे, पोका मनोज सोनुने, पोका कौतिक बोर्डे, पोका विनोद बोरे डीबी पथक बुलढाणा शहर या पथकाने पार पाडली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत