spot_img

काँग्रेमधून मुक्त होत “त्या” नेत्यांचा मुक्तगिरीवर शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला प्रवेश

बुलढाणा, 6 मार्च ( गुड इव्हिनिंग सिटी रणजीतसिंग राजपूत ) : सकाळी आम्ही दिलेले वृत्त “खरे ठरले”, याचा उच्चार आम्ही करणार नाही कारण गुड इव्हिनिंग साठी कधीही अंदाज व्यक्त करत नाही तर बातमी मागची बातमी वाचकांपर्यंत पोहोचवत असते. एडवोकेट गणेश सिंग, एडवोकेट विजय सिंग यांच्यासह काही पदाधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी थोड्या वेळापूर्वी शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. विजय अंभोरे सुद्धा शिवसेनेचा दुपट्टा गळ्यात घालून शिवसैनिक झाले आहेत. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री शिंदे यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर हा प्रवेश सोहळा पार पडला. विजय अंभोरे तथा राजपूत बंधूंनी काँग्रेस सोडल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवेशित झालेल्या या नेत्यांना शिंदे सेनेमध्ये कुठली जबाबदारी मिळेल याबाबत अजून पर्यंत काहीच निश्चित नाही. कैलास गवई, बापू लवांदे, बाळू सोनोने, सुनिल वैराळकर, देवराज पाटील, गजानन पालवे, आतिष इंगळे, भगवान पाटील अशी दिग्गज नावे प्रवेश घेतलेल्यांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत