spot_img

डोक्यात टॉमी घालून हत्या ; लाल माती फाट्यावर रक्ताचा सडा

बुलढाणा, 12 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी): क्रोध अग्नीपेक्षाही ज्वलनशील असतो, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. जुन्या वादातून लाल माती फाट्यावर अनिल प्रल्हाद बावस्कर (रा. पन्हेरा) यांची निघृण हत्या करण्यात आली. आरोपी प्रदीप गोविंदा कुळे ( वय 35) याने लोखंडी टामीने थेट त्यांच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला, त्यामुळे बावस्कर हे जागीच कोसळले आणि रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. आरोपी कुळेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला धामणगाव पोलीस स्टेशन येथे आणले गेले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु पोलिसांनी तातडीने त्याच्या मुसक्या आवळल्या. प्राथमिक माहितीनुसार ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती. विशेष म्हणजे ज्यांची हत्या झाली ते अनिल बावस्कर आणि आरोपी प्रदीप कुळे दोघेही एकाच गावचे म्हणजे पान्हेरा येथील राहणारे आहे.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत