spot_img

गवळीचा कारनामा मलकापूर पर्यंत पोहचला

नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 3 लाख 60 रूपयांचा गंडा


बुलढाणा, 13 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) :जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निलेश गवळी याने 62 जणांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 2 कोटी रूपयांनी गंडवले होते. विविध विभागांचे खोटे शिक्के वापरून त्याने फसवणूक केली होती. त्याच्यावर बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे. आता त्यात अजून एक भर पडली आहे ती मलकापूर येथील पवन दिलिप भारती यांना नोकरी लावून देण्याच्या नावाखाली 3 लाख 60 हजारांनी फसवणूक केली आहे.

आरोग्य सेवक पदावर नोकरी मिळवून देण्याच्या आमिषाने ३ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बुलढाणा येथील नीलेश विजय गवळी याच्या विरोधात मलकापूर शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पवन दिलीप भारती (रा. मलकापूर) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील राऊत करीत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नीलेश गवळी हा बुलढाणा येथील एकता नगरमध्ये राहतो आणि तेथे मासे विक्रीचा व्यवसाय करतो. फिर्यादी भारती यांचा त्याच्यासोबत २०२३-२४ दरम्यान संपर्क आला. त्यावेळी गवळी याने भारती यांना २०१९ मध्ये निघालेल्या आरोग्य सेवक पदाच्या जागांबाबत सांगितले. कोविड-१९ महामारीमुळे त्या भरतीला विलंब झाल्याचा दावा करत, भारती यांना नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले.भारती यांनी विविध मार्गानी एकूण ३.६० लाख रुपये त्याला दिले. त्यानंतर भारती यांनी वारंवार नोकरीबाबत विचारणा केली असता, गवळी याने वेगवेगळी कारणे सांगून वेळकाढूपणा केला. अखेर, गवळी याने फोन बंद करून ठेवला आणि घरी जाऊन विचारणा केल्यावर तो बेपत्ता असल्याचे समजले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर भारती यांनी पोलिसांत तक्रार दिली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत