spot_img

भादोल्यातील जि. प. शिक्षकांच्या उद्दामपणाचा विद्यार्थ्यांना फटका! ◾एकट्या मुख्याध्यापिकेने चालविली शाळा

बुलढाणा, 15 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः  होय, ही तीच शाळा आहे, ज्यातील 11 विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या हातावर ब्लेड मारले. भादोल्यातील जिल्हा परिषद शाळेतील मुले एवढी उद्दाम कशी? याचे उत्तर आज मिळाले आहे. या मुलांना शिकविणारे शिक्षकच जर उद्दाम असतील तर विद्यार्थी कुठून चांगले निघतील. आपले कर्तव्य विसरून या शाळेतील शिक्षकांनी सामूहिक रजा टाकत शाळेकडे पाठ फिरविली आहे. काल, रंगपंचमी होती. रजा घेणार्‍या शिक्षकांचा कालचा रंग उतरला नसावा, अशीही शंका या सामूहिक रजा प्रकरणामागे येत आहे. असो, पण एकट्या मुख्याध्यापिकीने आज संपूर्ण शाळा चालवून आपल्या कर्तव्यबद्धतेचा सडेतोड जबाब दिला आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांना सुगीचे दिवस यावे आणि या शाळा बंद पडू नाही यासाठी काही शिक्षक हे काम करतांना दिसून येतात. त्यांना या गोष्टीची जाणीव असते की, गोरगरीबांची मुले शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे यासाठी ते प्रयत्न करीत असतात. ज्यावेळी एखादा उपक्रम राबविण्याचा असल्यास त्यासाठी मेहनत लागती आणि ती मेहनत घेण्याची तयारी कुठल्याही क्षेत्रात नगण्य लोकांमध्ये असते. जि प शाळा भादोला येथे अशातलाच एक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी बदलाव करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना सहकार्य न करता सहकारी शिक्षकांनी वेगळी भुमिका घेतल्याची बाब समोर आली आहे. दोन तीन दिवसांपासून शाळेची बदनामी होत असतांना त्याकडे लक्ष देण्याएवजी सामुहिक रजेवर गेले आहे. प्रशासनाने त्यांची रजा का मंजूर केली असा प्रश्‍न सुध्दा  नागरिकांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचे पेपर तोंडावर असतांना शिक्षणाचा खेळ मांडला आहे. शिक्षक रजेवर असतांना मुख्याध्यापिका त्या मुलांना शिकवत आहे.
शाळेत वेळेवर येणे, उशिर झाल्यास लाल सही करणे, शालेय रेेकॉर्ड पूर्ण करणे व शाळेच्या वेळेत मोबाईल जप्त करण्याचा ठराव शालेय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. त्यामुळेच शिक्षकांनी दबाव गट निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती शाळा व्यवस्थापन समितीने दिली आहे.
जिल्हा आणि शिक्षण विभागाचे देखील मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरापासून जेमतेम पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या भादोला येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षणाचे देखील विदारक चित्र आहे. गलेलठ्ठ पगार घेऊनही विध्यार्थ्यांना शिकविण्यात तेथील शिक्षकांना रुची नाही की सर्वसामान्य विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याची काळजी नाही. नुकतेच पालकांनी विध्यार्थ्यांसह केलेल्या शाळा बंद आंदोलन मुळे या शाळेतील मनमानी, मोकाट कारभार चव्हाट्यावर आला, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या अब्रूची लक्तरे भादोला गावाच्या वेशीवर टांगल्या गेली आहे.
पालकांनी दिलेल्या माहितीनुसार आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती कडे केलेल्या तक्रारीनुसार येथे नियुक्त शिक्षक शिकवीन्याकडे दुर्लक्ष करीत आहे. शाळेत 198 विद्यार्थी असून 11 शिक्षक कार्यरत आहेत.अध्यापन तर सोडा विध्यार्थी करतात, कुठे जातात याकडे देखील त्याचे लक्ष नसते. यामुळे काही दिवसापूर्वी अकरा बाल विध्यार्थ्यांना महापुरुषांच्या शपथा देऊन हातावर ब्लेड मारण्यात आले. यामुळे त्यांच्या हातांना जखमा झाल्या. मात्र शिक्षकांना त्याची खबरही नव्हती. शिक्षकांच्या दुर्लक्षमुळे विध्यार्थी कधीही गेट उघडून बाहेर जात राहतात. अश्याच एका बालकाला मोकाट कुत्र्याने चावा घेतला.
दरम्यान यासंदर्भात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश मिसाळकर, सदस्यांनी बुलढाणा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, गट शिक्षणधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रारी केल्या. मात्र काहीच कारवाई करण्यात आली नाही.
यामुळे शाळा समिती व पालकानी विध्यार्थ्यांसह शाळा बंद आंदोलन केले. यानंतर कुठे प्रशासन हलले. यानंतर शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी गटशिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखांना चौकशीचे आदेश देऊन अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश दिले. एका शिक्षकाची शाळेतून बदली करून दुसर्‍या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी बाळकृष्ण खरात यांनी ही माहिती दिली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत