बुलढाणा, 21 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः पत्रकार हा समाजाचा आरासा आहे. पत्रकार जीवाची परवा न करता समाज हितासाठी आपली लेखणी व आयुष्य झिजवत असतात. साम टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव हे आपल्या झुंजार पत्रकारीतेसाठी प्रसिध्द आहे. पण त्यांची पत्नी काही कमी झुंजार नाही हे आजच्या घटनेवरून समोर आले आहे.
शहरातील वार्ड नं.1 मधील सम्राट अशोक नगर येथे आज दुपारच्या सुमारास डीपीला आग लागल्याची घटना घडली आहे. तापमान वाढल्यामुळे आग लागल्याची माहिती आहे. परंतू आग कशामुळे लागली याबाबत ठोस माहिती मिळाली नाही. त्याच परिसरातील सौ.लताताई संजय जाधव यांनी आग लागल्याचे दिसताच त्यांनी जीवाची परवा न करता ती आग विझवली. मोठा अनर्थ त्यांच्या सर्तकतेमुळे टळला. त्यांच्या या धाडसाला सलाम कुठल्याही प्रकारची परवा न करता त्यांनी आग विझवली. पत्रकारच नाही तर पत्रकारांच्या पत्नी सुध्दा समाजाच्या हितासाठी आपले सर्मपण करण्यास तयार असतात हे पुन्हा सिध्द झाले आहे. पत्रकार जेव्हा पत्रकारीता करतात तेव्हा ते आपला जीव धोक्यात घालून पत्रकारीता करीत असतात तेव्हा त्यांच्या पत्नीचे त्यांना खंबीर साथ असते. त्याच्याशिवाय ते पत्रकारीता करू शकत नाही. प्रसंग आलाच तर पत्रकाराची पत्नी सुध्दा जीव धोक्यात घालून पुढे येते.
या प्रकरणाकडे महावितरणने तात्कळ लक्ष देणे गरजेचे आहे. संभाव्य घटना टाळण्यासाठी महावितरणने पाऊले उचलावी.