बुलढाणा, 27 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : ज्योतिष शास्त्रानुसार असे म्हटले जात आहे, की जवळपास 2000 वर्षांनी शनिवारी सूर्यग्रहण आणि शनी अमावस्येचा दुर्लभ योग जुळून येत आहे. शनी देव आणि सूर्य हे केवळ ग्रह नाही तर पिता पुत्र आहेत. त्या दोघांचा एकत्र संयोग होत असल्याने त्या दिवशी ज्योतिष अभ्यासकांनी दिलेले उपाय करून आपल्याला शनी तसेच सूर्य कृपा प्राप्त करता येईल. हिंदू पंचागानुसार, एका वर्षात 12 अमावस्या असतात. ज्योतिषशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून यंदाची फाल्गुन अमावस्या म्हणजेच शनि अमावस्या खूप महत्त्वाची आहे. पुराणानुसार पितृदोषापासून तसेच विविध समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे, हा दिवस शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी खूप शुभ मानला जातो, ज्या लोकांवर शनीची साडेसाती किंवा ढैय्याचा प्रभाव आहे. त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शनिश्चरी अमावस्येच्या दिवशी काही गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते. या विशेष दिवसाबद्द्ल सांगायचं झालं तर, शनि अमावस्येसोबतच सूर्यग्रहणही होणार आहे, ज्यामुळे या दिवसांचं महत्त्व आणखी वाढलंय. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक दुर्लभ योगायोग मानला जातोय. या दिवशी काही खास उपाय केल्यास अनेकांना विविध समस्यांतून मुक्ती मिळू शकते. वैदिक दिनदर्शिकेनुसार, शनि अमावस्या तिथी 28 मार्च रोजी संध्याकाळी 07:55 वाजता सुरू होईल आणि दुसर्या दिवशी म्हणजेच 29 मार्चला संध्याकाळी 04:27 वाजता समाप्त होईल. अशा स्थितीत उदय तिथीनुसार 29 मार्च रोजी शनि अमावस्या असणार आहे. तर भारतीय वेळेनुसार, वर्षातील हे पहिले सूर्य ग्रहण दुपारी 2.21 वाजल्यापासून ते सायंकाळी 6.14 वाजेपर्यंत असणार आहे. हे सुर्यग्रहण खंडग्रास असणार आहे. हे भारतात दिसणार नाही.
बुलढाणा येथील शनी मंदिरात शनिवार, दिनांक 29 मार्च रोजी शनी देवाचे दर्शन, दान, वस्तु अर्पण व तेल अभिषेकसाठी शीन देव मंदिर शनी गल्ली बुलढाणा येथे नोंदणी सुरू आहे. तसेच शनी आमवस्याच्या दिवशी गरीब, अनाथ, अपंग लोकांना अन्नदान करावे. यासाठी गहू, तांदूळ, साखर, तूप, तेल, हरभरा दाळ, तुरदाळ मंदीरात जमा करावे.