बुलढाणा, 10 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः तीन शालेय राज्यस्तरीय खेडाळुुंवर बुलढाणा जिल्हा फुटबॉल असोसीएशनचे सचिव एन. आर वानखेडे यांनी केलेल्या अन्याया बाबत त्यांच्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी 9 एप्रिल रोजी पालकमंत्री बुलढाणा तथा जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कडे एका तक्रार अर्जाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. सदरच्या तक्रार अर्जात नमुद आहे. की, वेस्टर्न इंडियन फुटबाल असोसीएशन, मुंबई यांच्या वतीने लोणावळा येथे अंडर-20 मुले फुटबाल स्पर्धा दिनांक 10 ते 14 एप्रिल पर्यंत सिंहागड कॉलेज लोणावळा येथे आयोजीत करण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी नॅशनल फुटबाल असोसीएशन बुलढाण्याचे तीन शालेय राज्यस्तरीय खेडाळुंच्या नावाची नोंदणी दिनांक 2 फेब्रुवरी 2025 रोजी फोन पे द्वारे रितसर फी देऊन जिल्हा संघटनेचे सचिव एन.आर वानखेडे यांच्याकडे करण्यात आली होती. दरम्यान दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी सचिव एन.आर वानखेडे यांनी तिन्ही खेळाडू यांना व्हाटसअप द्वारे कळविले की, ज्या मुलांची सीआरएस अंडर-20 साठी झाले आहे. अश्या खेडाळंनी दिनांक 7 एप्रील 2025 पासुनच स्थानिक क्रिडा संकुल जांभरून रोड येथे सायंकाळी 4.30 हाजर रहावे. सदर व्हाटसअप मॅसेज मिळाल्या नंतर शालेय राज्यस्तरीय खेळाडू यामध्ये मोहम्मद इरफान शकील चौधरी, शेख अहेफाज शेख सादिक आणि आमिर खान रफिक खान हे नमुद ठिकाणी दिलेल्या वेळेपुर्वी क्रिडा संकुल येथे हजर झाले. तीन्ही खेडाळुंनी सचिव एन.आर वानखेडे यांना सीआरएस संदर्भात विचारपुस केल्या नंतर वानखेडे यांनी अरे रावीच्या भाषेचा वापर करत उडवा उडविचे उत्तर दिले. नॅशनल फुटबॉल असो.बुलढाण्याचे अध्यक्ष शहेबाज खान कुरेशी यांनी सचिव वानखेडे यांच्याशी संपर्क साधुन खेडाळुंची सीएसआर माहिती घेतली असता यावर वानखेडे यांनी सांगीतले सदर खेडाळुंची सीआरएसमध्ये निवड झाली की नाही ? या संदर्भांत माहिती घेवून कळवतो. दरम्यान आज रोजी बुलढाणा जिल्हा फुटबॉल संघटनेचा संघ स्पर्धेसाठी लोणावळा येथे रवाना होणार असुन आमच्या खेडाळुंच्या निवडी बाबत सचिव वानखेडे यांनी अद्यापही कळवले नाही ? त्यामुळे जिल्हा फुटबॉल असोसीएशनचे सचिव वानखेडे यांनी जाणिव पुर्वक अन्याय केला असुन त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा तक्रार अर्जाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सदरच्या तक्रार अर्जावर अन्याय झालेल्या खेळाडू यांच्या स्वाक्षर्या आहेत.
गुड इव्हिनिंग सिटीने सचिव एन आर वानखेडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, यासंदर्भात काय तक्रार दिली आहे. त्याची माहिती घेऊन नंतरच प्रतिक्रिया देतो. परंतू सध्या कामात व्यस्त असल्याने आज प्रतिक्रिया देवू शकत नाही.