spot_img

महाराष्ट्रासाठी “भूषणा”वह ..!! विदर्भाचे सुपुत्र भूषण गवई 52 वे सरन्यायाधीश

◾ दिल्लीतील शपथ ग्रहण समारंभात ॲड. विजय सावळेंची उपस्थिती
◾बुलढाणा वकील संघाकडून सरन्यायाधीशांना थेट शुभेच्छा
बुलढाणा, 14 मे गुड इव्हिनिंग सिटी ः महाराष्ट्रासाठी आणि त्यातल्या त्यात विदर्भासाठी आजचा दिवस भूषणावह आहे. 52 वे सरन्यायाधीश म्हणून ज्यांनी शपथ घेतली ते न्यायमूर्ती भूषणकुमार गवई विदर्भाचे सुपुत्र आहेत. भूषणकुमार गवई यांच्या रूपाने अनुसूचित जाती वर्गातील दुसरे मागासवर्गीय आणि पहिले बुद्धीस्ट सरन्यायाधीश देशाला लाभले आहेत. आज, राष्ट्रपति भवनात न्यायमूर्ती भूषणकुमार गवई यांचा शपथविधी पार पडला. राष्ट्रपति दौपदी मुर्मू यांनी नव्या सरन्यायाधीशांना शपथ दिली. दिल्लीत झालेल्या या शपथविधी सोहळयात बुलढाण्याचीही उपस्थिती होती. बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. विजय सावळेंसह न्यायाधीश सचिन भंसाली आणि न्यायाधीश अरविंद वानखेडे या सोहळ्‌‍यासाठी आमंत्रित होते. ॲड. विजय सावळे यांनी गुड इव्हिनिंग सिटीला सोहळ्‌‍यातूनच प्रतिक्रिया दिली की, महाराष्ट्रासाठी, विदर्भासाठी आणि बुलढाण्यासाठी ही आनंदाची बाब आहे. विदर्भाशी अतूट नाते असणारे भूषणकुमार गवई देशाचे सरन्यायाधीश होतात, हे अभिमानास्पद आहे. मागासवर्गीय समाजाला मिळालेले हे सर्वोच्च प्रतिनिधीत्व बाबासाहेबांच्या संविधानाची कमाल असून न्यायप्रणालीची व्यापकता अधोरेखीत करणारे असल्याचेही ॲड. सावळे म्हणाले. मागील वर्षी 24 ऑगस्ट श्री भूषणकुमार गवई बुलढाणा येवून गेले होते. याठिकाणी बुलढाणा जिल्हा न्यायालयाच्या नव्या ईमारतीचे त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले होत्ो. विशेष म्हणजे ॲड. सावळे यांच्या खास आग्रहास्तव श्री गवई त्यावेळी बुलढाणा येथे आले होते. आज,सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर ॲड. सावळे यांनी सरन्यायाधीश श्री गवई यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. बुलढाणा जिल्हा वकील संघाकडून सरन्यायाधीशांना शुभेच्छा प्रदान केल्या. त्यांनीही शुभेच्छांचा आनंदाने स्वीकार करीत बुलढाण्याविषयीचे प्रेम व्यक्त केले. सन 2007 मध्ये के.जी. बालाकृष्णन देशाचे पहिले दलित सरन्यायाधीश बनले होते.
जस्टीस भूषणकुमार गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी अमरावतीमध्ये झाला होता.

  1. ◾त्यांनी 1985 मध्ये वकीलीला सुरुवात केली. पुढील दोन वर्षांपर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे माजी ॲडव्होकेट जनरल आणि न्यायमूर्ती राजा एस. भोसलेसोबत काम केले.
    ◾1990 मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रॅक्टीसला सुरुवात केली. यादरम्यान त्यांनी नागपूर महापालिका, अमरावती महापालिका आणि अमरावती विद्यापीठाकडून वकील म्हणून काम केले. ◾ऑगस्ट 1992 पासून जुलै 1993 पर्यंत श्री गवई नागपूर उच्च न्यायालयात सहायक सरकारी वकील आणि अतिरीक्त लोक अभियोजक म्हणून नियुक्त होते.
    2000 मध्ये ते सरकारी वकील बनले.
    ◾14 नोव्हेंबर 2003 मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरीक्त न्ययाधीश म्हणून पदोन्नती मिळाली. 12 नोव्हेंबर 2005 मध्ये श्री गवई उच्च न्यायालयाचे स्थायी न्यायाधीश बनले.
    ◾24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी बढती मिळाली.

◾श्री गवई यांचे वडील रामकृष्ण सूर्यभान गवई ज्यांना रा.सू. गवई म्हणून ओळखले जायचे, te रिपाईचे संस्थापक होते. 2006 ते 2011 या दरम्यान रा.सू. गवई बिहार, सिक्कीम आणि केरळचे राज्यपालपदी राहिले. नागपूरच्या दीक्षाभूमि स्मारक समितीचे रा.सू. गवई यांनी अध्यक्षपदही भूषविलेले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत