spot_img

घात की अपघात?? रविकांत तुपकर यांच्या गाडीला ट्रकची धडक

तुपकर बचावले पण दोघांना मार
◾ वाशी-पारगावच्या टोलनाक्यावर मध्यरात्रीची घटना

बुलढाणा, 18 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष तसेच क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या “लोकरथ” गाडीला एका ट्रकने मागून धडक दिली. या अपघातात तुपकर सुदैवाने बचावले असून गाडीतील मात्र दोन जणांना मुका मार लागला आहे. यापैकी एक जण त्यांचे स्वीय सहाय्यक तर दुसरा संघटनेचा पदाधिकारी आहे. जालन्याच्या दिशेने येत असताना तुपकर यांच्या गाडीला वाशी तालुक्यातील पार पारगाव टोल नाक्यावर मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने धडक दिली. ट्रक ड्रायव्हरची उडवाउडवीची उत्तरे आणि त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेता सदर घटना ही घातपात तर नाही ना असा संशय तुपकर समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे. गुड इव्हिनिंग सिटीने याबाबत तुपकरांशी संपर्क साधला असता त्यांनीही शंका व्यक्त केली आहे आणि सदर घटनेची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. शेतकरी कर्जमुक्ती साठी रविकांत तुपकरांची राज्यभर ठिकठिकाणी एल्गार सभा होत आहे. यानिमित्त तुपकर राज्यभर दौरा करून शेतकरी आणि सामान्य जनतेशी संवाद साधत आहेत. त्यांच्यासोबत मित्र गजानन नाईकवाडे, स्वीय सहाय्यक कार्तिक सवडतकर आहेत. काल 17 एप्रिल च्या रात्री आंबेजोगाई तालुक्यातील देवळा येथे सभा आटोपून तुपकरांची इनोव्हा गाडी “लोकरथ” (एम एच 28 बीक्यू 9999) जालना जिल्ह्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी त्यांच्यासोबत पंढरपूर येथील राजाराम पंढरी जाधव सुद्धा होते. मध्यरात्रीनंतर 12:30 माझे दरम्यान पारगाव टोल नाक्याच्या ठिकाणी टोल भरण्यासाठी तुपकरांची गाडी थांबली. याच वेळी पाठीमागून त्यांच्या कार्याला कोणीतरी जोरदार धक्का दिला. मोठा आवाज झाला आणि तुपकरांची गाडी थोडी पुढे सरकली. बघितले असता असे लक्षात आले की त्यांच्या गाडीला ट्रकने मागून जोरदार धडक दिली आहे. गाडीच्या मागील भागात बसलेला कार्तिक आणि पंढरी जाधव यांना किरकोळ मार लागला होता. तुपकर थोडक्यात बचावले होते. त्यांच्यासह त्यांचा ड्राइवर अजय मालगे आणि नाईकवाडे सुरक्षित होते. या अपघातानंतर टोल नाक्यावर गर्दी जमली आणि तिथल्या जमावाने ट्रक ड्रायव्हरला खाली उतरवले. दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. धडक देणाऱ्या ट्रक ड्रायव्हर उडवाउडवीची उत्तरं देत होता. वाशी पोलिसांनाही हा सगळा प्रकार संशयास्पद वाटला. त्यांनी ट्रक ड्रायव्हर आणि क्लीनरला तात्काळ ताब्यात घेतली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धडक दिलेला ट्रक क्रमांक एम एच 44 यु 14 44 जप्त करण्यात आला आहे. चौकशीमध्ये ट्रक ड्रायव्हरचे नाव संभाजी विठ्ठल डोंगरे असल्याचे कळते. तो पंढरपूर येथील संभाजी चौकात राहतो. संभाजी डोंगरे च्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 281 तसेच मोटर वाहन अधिनियम 1988 चे कलम 185 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपकर यांच्या इनोव्हा गाडीचे मोठे नुकसान झाले असून तुपकर आता जालना जिल्ह्याचा दौरा सोडून बुलढाण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत