धर्मवीर आमदारांच्या वाढदिवशी सुरु झालीत 43 कोटींची कामे!
बुलढाणा, 29 मे (गुड इव्हिनिंग सिटी/रणजीतसिंग राजपूत) ः तो पत्ता करतो गुल, पॉवरफुल… हे एक तुफान गाजलेलं गाणं आहे… आमदार संजय गायकवाड जेव्हा दुसर्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत, तेव्हा ते विरोधकांचा पत्ता गुल करणारे पावरफुल नेते असल्याचे त्यांनी सिद्ध करून दाखवले. वागणे आणि बोलणे दोन्ही बाबत बेधडक असलेल्या आमदार गायकवाड विकास कामांच्या बाबतीतही धडाकेबाज असल्याचे बुलढाणेकरांनी पाहिले आहे. काही नाही ते वर्षभर काहीच करत नाही आणि मग वाढदिवसाला कोटींची विकासकामे करण्याचा कांगावा करतात. आमदार गायकवाड वर्षभर विकास कामे करत असतातच. त्यामुळे स्वतःचा वाढदिवस त्यांनी कुठलीही दगदग न करता साजरा केला तरी बिघडत नाही. परंतु वाढदिवसालाही आपल्या हातून काही ना काही विकास कामे व्हावी या प्रामाणिक हेतूने त्यांनी आज सुमारे 43 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन केले.
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे आमदार संजय गायकवाड यांचा वाढदिवस 43 कोटी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन सह जगदंबा मातेच्या मंदिरात महाआरती व महाराष्ट्र राज्य साजरा करण्यात आला सदर वाढदिवस यावेळी विविध ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आले बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे धडाडीचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची मतदारसंघात विकास पुरुष म्हणून प्रतिमा निर्माण झालेली आहे त्यांनी हीच प्रतिमा आपल्या वाढदिवसाच्या बुलढाणा मतदारसंघात तब्बल 43 कोटी रुपयांच्या विविध विकास कामाचे भूमिपूजन करून आपला वाढदिवस साजरा केला सदर भूमिपूजन दरम्यान शहरातील अष्टविनायक नगर नाम फालकापासून ते नगर परिषद हद्दीच्या पूर्व बाजूला जाणार्या रस्ता सिमेंट काँक्रीकरणासह दोन्ही बाजूने नाली व पेव्हर ब्लॉग चे काम यासाठी तब्बल पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला पाच कोटी एक्यांशी लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यासह प्रभाग क्रमांक 13 येथील बापू पठ्ठे यांच्या घरापासून ते नगर परिषद हद्दीपर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता दोन्ही बाजूला नाली व फेवर ब्लॉक या कामासाठी चार कोटी 45 लाख रुपये तसेच वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत बुलढाणा शहरातील संगम तलावाच्या पुनर्जीवनीकरण करणे यासाठी 13 कोटी राज्यस्तर महानगृहस्थान योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती ते धाड रोड जोडणार्या रस्त्याचे डांबरीकरणासाठी व दोन्ही बाजूने नाली व फेवर ब्लॉक या कामासाठी सहा कोटी सदतीस लाख रुपये चा निधी मंजूर केला सदर कामाचे व इतर विविध विकास कामाचे भूमिपूजन सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान करण्यात आले तरतूर्वी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान बुलढाणा शहरातील जगदंबा देवी मंदिरात आमदार संजय गायकवाड यांच्या दीर्घायुष्यासाठी महा अभिषेक व महाआरती करण्यात आले त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता महाराष्ट्रातील घेण्यात आले सदर शिवीर मातोश्री जनसंपर्क कार्यालय येथे पार पाडले यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओम सिंग राजपूत शहर प्रमुख गजेंद्र दांदडे युवा सेना जिल्हाप्रमुख मृत्युंजय गायकवाड धर्मवीर युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज गायकवाड श्रीकृष्ण शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
500 कार्यकर्त्यांनी केले रक्तदान
बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी मातोश्री संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्रातील घेऊन वाढदिवस उत्साहात साजरा केला जातो यंदाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 500 कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन रक्तदान करत आपल्या नेत्याचा वाढदिवस सामाजिक जबाबदारी स्वीकारत पार पाडला.