spot_img

“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महायुती एकत्रित लढेल”

 सेनेचे जिल्हा संघटक पद सांभाळताच आ. गायकवाड यांचे पहिले विधान 
बुलढाणा, 4 जून (गुड इव्हिनिंग सिटी /रणजीतसिंग राजपूत) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी टाकली आहे. पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आ. गायकवाड यांना बुलढाणा जिल्हा संघटक पदाची कमान दिली आहे. पदभार सांभाळताच आ. गायकवाड यांनी गुड इव्हिनिंग सिटीजवळ पहिले विधान केले आहे की, बुलढाणा जिल्ह्यामध्ये महायुती अभेद्य आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपा महायुती सदर निवडणुका एकत्रित लढणार असून कुणीही शंका घेण्याचे कारण नाही, असेही गायकवाड म्हणाले.
शिवसेनेच्या बुलढाणा जिल्हा संघटकपदी आ.गायकवाड
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाकडून राज्यभरात संघटनात्मक पुनर्रचना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील सर्व संपर्कप्रमुख पदे रद्द करून ‘जिल्हा संघटक’ ही नवी रचना करण्यात आली असून, बुलढाणा जिल्ह्याची ही जबाबदारी आमदार संजय गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे.
जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि पक्षनिष्ठा लक्षात घेता नेतृत्वाने विश्वास दाखवला आहे. आगामी जिल्हा परिषद, नगरपालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी ही भूमिका महत्त्वाची असणार आहे.
जिल्हा संघटक पदाच्या माध्यमातून पक्षातील सर्व अंगिकृत संघटनांशी समन्वय साधण्याचे कार्य आता माध्यमातून पार पाडावे असे स्पष्ट निर्देश शिवसेना पक्षाचे मुख्यनेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत.
नियुक्तीपत्र देताना केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव आणि महिला संघटक सौ. ज्योतीताई वाघमारे उपस्थित होत्या. याच कार्यक्रमात सौ. अनुजाताई सावळे, जिजाताई राठोड यांच्यासह अनेक महिलांनी शिवसेना महिला आघाडीत प्रवेश केला.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत