◾समज, गैरसमज व नियंत्रण संदर्भात मार्गदर्शन
बुलढाणा, 5 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : हाय ब्लड प्रेशरने जगभरातील एक तृतीयांश लोकसंख्या प्रभावित आहे. जागतिक आरोग्य संघटनेने हाय बीपीच्या समस्येला गंभीरतेने घेतले आहे. रिपोर्ट म्हणते की, भारतात जवळपास प्रौढांमध्ये 18 कोटी लोकांना हाय बीपीचा त्रास आहे. या वाढत्या आजाराबाबत जनजागृतीच्या अनुषंगाने असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाच्या बुलढाणा शाखेने उच्च रक्तदाब संदर्भात 7 जून रोजी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ए.पी.आय. बुलढाणा व ए.पी.आय. विदर्भ शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उच्च रक्तदाब समज-गैरसमज व नियंत्रण यासंदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे अयोजन केले आहे. शनिवार, दिनांक 7 जून रोजी गोर्वधन हॉल, बुलढाणा अर्बन मुख्य शाखेसमोर संध्याकाळी 6 वाजता बुलढाणा येथे विदर्भातील नामवंत डॉक्टर्स व व्याख्याते उपस्थित राहणार आहे. यामध्ये प्रा. डॉ.पद्माकार सोमवंशी, डॉ.जयराज कोरपे, डॉ.दिपक मोरे, डॉ.प्रशांत पोफळकर, डॉ.महेश बोडखे, डॉ.सुरेश छाजेड, डॉ.दिपक लध्दड, डॉ. अमोल कोथलकर असणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एपीआयचे जिल्हा समन्वयक डॉ.सचिन झगडे तसेच जिल्हा सचिव डॉ.दिपक काटकर यांनी केले आहे.