spot_img

गुलाबरावांचा निर्णय, सत्काराला गुलाब नको वही-पुस्तक-पेन द्या !

बुलढाणा, 7 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलबाराव खरात यांनी कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. तो म्हणजे आता कुठल्याही समारंभात पुष्पगुच्छ न आणता शालेय उपयोगी वस्तू देण्याचे परिपत्रकच काढले आहे आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी गुरूवार 5 जून रोजी परिपत्रक काढले आहे त्यामध्ये नमूद आहे की, जिल्हा परिषद बुलडाणा अंतर्गत सर्व कार्यालयांमध्ये आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांमध्ये, मान्यवरांचे स्वागत करताना ताज्या फुलांच्या बुके ऐवजी शालेय साहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके, फळझाडांची रोपे देण्याची किंवा स्वीकारण्याची नविन पद्धत अंमलात आणली आहे.
बुलढाणा जिल्हा परिषदेतंर्गत विविध कार्यालयांव्दारे अनेकवेळा बैठकांचे आयोजन होत असते. अशा वेळी राजशिष्टाचार म्हणून मान्यवरांचे स्वागत फुलांच्या बुके ऐवजी शालेय साहित्य, ज्ञानवर्धक पुस्तके, फळझाडांची रोपे देण्याची किंवा स्वीकारण्याची नविन पद्धत सुरु करण्याची बाब विचाराधीन होती, त्यानुषंगाने जिल्हा परिषद बुलढाणा अतंर्गत विविध कार्यालये, पंचायत समिती, तालुका कार्यालये, ग्रामपंचायती इत्यादी व्दारे आयोजित करण्यात येणारे सार्वजनिक व शासकीय समारंभामध्ये मान्यवरांच्या स्वागतासाठी किंवा लोकप्रतिनिधी, अधिकारी यांचे स्वागतासाठी बुके ऐवजी खालील साहित्य देण्या घेण्याची पध्दत ठेवावी.
यमाध्ये शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी उपयोगी ठरणारे शालेय साहित्य वह्या, पेन, पेन्सिल, ड्रॉइंग साहित्य इत्यादी. ज्ञानवर्धक पुस्तके विशेषतः मुलांसाठी वा वाचनालयासाठी उपयुक्त, फळझाडांची रोपे, आंबा, सिताफळ, आवळा, चिंच फुल रोपे इत्यादी
ही कृती फक्त स्वागतापुरती मर्यादित नसून सामाजिक जबाबदारी म्हणूनही अंगीकारावी. अशा पध्दतीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन आणि वृक्षलागवडीला चालना देऊन हरित जिल्हा घडविण्याचा उददेश आहे. सदर परिपत्रक आपले अधिनस्त सर्व यंत्रणांचे निदर्शनास आणावे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत