spot_img

बुलढाणेकरांनो सदृढ आरोग्यसाठी योगोत्सवात सामील व्हा : मुख्याधिकारी पांडे

’माय भारत’ आणि ’योगसंगम’ पोर्टलवर नोंदवा

बुलढाणा, 19 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : सदृढ आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा करावा त्याचप्रमाणे ’माय भारत’ आणि ’योगसंगम’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन बुलढाणा नगर परिषद मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले आहे. शनिवार, दिंनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. योग हा आपल्या प्राचीन भारतीय संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. शारीरिक, मानसिक आणि आत्मिक आरोग्यासाठी योगाचे महत्त्व अनमोल आहे. नियमित योग केल्याने आरोग्य टिकून राहते, ताणतणाव कमी होतो आणि एकाग्रता वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये योगाबाबत जनजागृती व्हावी हा उद्देश असून त्यानुसार कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे.
आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 च्या (International Yoga Day 2025) निमित्ताने, सर्व नागरिकांना आणि संस्थांना ’माय भारत’ (My Bharat Portal) आणि ’योगसंगम’ (Yogsangam Portal) या पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या नोंदणीमुळे योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना व्यापक स्वरूप मिळेल आणि जास्तीत जास्त नागरिकांना यात सहभागी होता येईल.
’माय भारत’ पोर्टलवर वैयक्तिक नोंदणी प्रत्येक नागरिकाला, विशेषतः तरुणांना, ’माय भारत’ पोर्टलवर (https://mybharat.gov.in/) स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या पोर्टलवर नोंदणी करून नागरिक आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे भाग घेऊ शकतात. योग दिनाचे महत्त्व, योगाचे फायदे आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ही नोंदणी अत्यंत महत्त्वाची आहे.
’योगसंगम’ पोर्टलवर कार्यक्रम स्थळांची नोंदणी विविध संस्था, योग केंद्रे, शाळा, महाविद्यालये आणि स्थानिक संस्थांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या ठिकाणांची नोंदणी ’योगसंगम’ पोर्टलवर (https://yogsangam.nic.in/) करावी. या पोर्टलवर कार्यक्रम स्थळांची नोंदणी केल्याने देशभरातील योग दिनाच्या कार्यक्रमांचे एकत्रीकरण करणे शक्य होईल. यामुळे लोकांना त्यांच्या जवळच्या योग कार्यक्रमांची माहिती मिळण्यास मदत होईल आणि योग दिनाचे आयोजन अधिक प्रभावी होईल. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग तसेच योगाचे महत्त्व आणि फायदे लोकांपर्यंत पोहोचवणे आणि राष्ट्रीय स्तरावर योग दिनाच्या कार्यक्रमांची माहिती उपलब्ध करणे तसेच जास्तीत जास्त नागरिकांना योगाशी जोडले जाण्यासाठी प्रोत्साहित करता येईल.
आपण क्यूआर कोड (QR CODE) स्कॅन करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून सर्वांनी या मोहिमेत सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 यशस्वी करावा, असे आवाहन बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत