बुलढाणा आय एम ए चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बुलढाणा, 8 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : होमिओपॅथी डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या नोंदणीचा निर्णय हा अन्यायकारक आणि धोकेदायक असल्याचे सांगत बुलढाणा जिल्हाधिकारी यांना याबाबत आय एम ए ने निवेदन दिले आले आहे. महाराष्ट्र शासनाने 15 जुलै 2025 पासून एक आदेश लागू करत, ज्या होमिओपॅथी (BHMS) डॉक्टरांनी फार्माकॉलॉजी या विषयात एक वर्षाचा ब्रिज कोर्स (CCMP) केला आहे, अशा डॉक्टरांची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टर मध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय अत्यंत धोकादायक असून जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा आहे. पूर्वी दाखल केलेली याचिका -यायालयीन प्रक्रिया सुरू असताना शासन निर्णय ?
फेब्रुवारी 2025 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) महाराष्ट्र शासनाच्या संभाव्य निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय अजून आला नाही.
अशा स्थितीत शासनाने 15 जुलै 2025 पासून अमलात येणारा नवीन आदेश काढणे म्हणजे न्यायालयाचा संभाव्य अवमान (contempt of court) होतो. MBBS मध्ये प्रशिक्षित डॉक्टर हे संपूर्णपणे सायंटिफिक व पुराव्याधारित उपचारपद्धती शिकतात.
तर BHMS डॉक्टरांचे शिक्षण हे पूर्णतः होमिओपॅथीवर आधारित असते आणि त्यांना आधुनिक औषधे, सर्जरी, आपत्कालीन वैद्यकीय व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळत नाही.
CCMP कोर्स म्हणजे काय ?
हा एक 1 वर्षाचा ब्रिज कोर्स आहे जो होमिओपॅथी डॉक्टरांसाठी आखण्यात आलेला आहे. या कोर्समध्ये अत्यल्प प्रमाणात फार्माकॉलॉजी, मेडिसिन यांचे प्राथमिक ज्ञान दिले जाते.
हा कोर्स कोणत्याही प्रकारे MBBS सरासरीच्या 5.5 वर्षांच्या अभ्यासक्रमास तुल्य नाही.
! काय धोका आहे?
जर अशा डॉक्टरांना “Modern Medicine Practitioner” म्हणून मान्यता दिली गेली तर सामान्य रुग्ण गोंधळात पडतील.
आपत्कालीन परिस्थितीत चुकीचे औषधोपचार, चूक निदान, सर्जिकल अज्ञान यामुळे रुग्णाच्या जीवाला धोका होतो. यामुळे मान्यताप्राप्त MBBS डॉक्टरांची प्रतिमा मलिन होते असे निवेदनात नमूद आहे. या निवेदनावर डॉ.जे बी राजपूत, डॉ. जी वाय व्यवहारे यांच्या सह्या आहेत.