spot_img

बुलढाणा हादरले !! पिसाळलेल्या कुत्र्याचा 11 जणांना चावा

बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः शहरात अकरा जणांना पिसाळलेला कुत्रा चावल्याची घटना आज 9 जुलैच्या दुपारच्या सुमारस घडली आहे. बुलढाणा शहरात मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. रस्त्याने एकटे जात असतांना सात आठ कुत्र्यांचा घोळका दिसून येतो. तेथून जात असतांना नगरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. कारण ते कुत्रे कधी हल्ला करतील याचा नेम नाही. अनेक वेळा मोटारसायकल ने किंवा शाळकरी विद्यार्थी रस्त्याने जात असतांना रस्त्यावर बसलेला कुत्र्यांचा घोळका हल्ला करण्याच्या प्रयत्नात काही नगारिक व विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्याच्या घटना या आधी शहरात घडल्या आहे.
आज 9 जुलै रोजी दुपारच्या सुमारास हिरोळे पेट्रोल पंपासमोरून रस्त्याने पायी जात असतांना एका व्यक्तीवर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. त्या पिसाळलेल्या कुत्र्याने या आधी दहा ते अकरा जणांना चावा घेतल्याचे समजते. त्या नगरिकाला काही सुज्ञ नागरिकांनी त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले आहे. या घटनेनंतर नगर पालिका प्रशासनाने तात्कळ या पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता जोर धरत आहे. त्यामुळे यापुढे कुण्या नगरिकावर हल्ला होण्याआधी कुत्र्यांचा बंदोबस्त प्रशासनाने करावा.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत