बुलढाणा, 9 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः ख्रिस्ती धर्मगुरुबद्दल अशोभनीय विधान करणार्या आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात उद्या, गुरुवार 10 जुलै 2025 रोजी बुलढाणा येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात ख्रिस्ती बांधवांनी केलेल्या आवाहनानुसार सकाळी 10 वाजता चर्च ऑफ दी नाझरीन, साने नगर, आशिर्वाद हॉस्पीटलजवळ बुलढाणा येथून हा मोर्चा निघेल. पडळकरांचे विधान ख्रिस्ती समाजाचा अवमान करणारे असून याविरोधात निषेध नोंदविण्यासाठी समाजबांधवांनी एकत्रीत यावे, जेणेकरून शासनापर्यंत समाजाचा आवाज पोहोचविला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले गेले आहे. आ. पडळकर यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशीही मागणी आंदोलनादरम्यान केली जाणार आहे. तरी सकल ख्रिस्ती समाज बांधवांनी मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.