spot_img

चॅलेंज देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या आ. गायकवाडांनाच चॅलेंज !

गायकवाडांना म्हणाले, ‘जागा आणि वेळ सांगा’..

बुलढाणा, 13 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः आमदार निवासातील कॅन्टिन प्रकरणानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या बाजूने तर काही त्यांच्या विरोधात विधाने आले. त्यांनी स्वतः सांगितले की ‘मेरा रस्ता गलत था.. लेकिन मंजील सही थी’ असे वक्तव्य आमदार निवासातील कॅन्टिन मध्ये खराब जेवण दिल्यामुळे तेथील कर्मचार्‍याला मारहाणी नंतर केले. त्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. आमदार संजय गायकवाड हे खुले चॅलेंज देण्यासाठी राज्यालाच नाही तर देशालाही माहित झाले आहे. पण गायकवाडांना खुले चॅलेंज देणाराही समोर आला आहे. एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील असे त्या चॅलेंज करणार्‍याचे नांव असून त्यांनी पीटीआयशी बोलतांना आ. गायकवाड यांना खुले चॅलेंज देत म्हटले की, जगह आपकी.. वक्त आपका !! छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की, “तू असशील आमदार तुझ्या घरचा परंतु तुला अशी गुंडागर्दी करायला पाठवलेलं नाही. खरंच जर तू मर्दाचं पोरगं असला असता तर तू विधिमंडळाच्या सभागृहात उभा राहून, जे गरिबांच्या पोटावर लाथ मारून तुम्ही तुमचे खिसे भरताय त्याबाबत प्रश्न विचारले पाहिजे होतं. तुला थोडंफार अन्न काय खराब झालेलं दिसलं तर तू अशाप्रकारे एका गरीब, लाचार, असहाय्यला बुक्का मारणार का? मी तर तो जो वेटर होता, त्याला म्हणून इच्छित होतो की तू बघितलंही नव्हतं पाहिजे की तो कोण आहे, त्याची बनियन फाडून, लुंगी ओढून त्याला नग्न करून तिथंच मारलं पाहिजे होतं. कारण, त्यांना तीच भाषा समजते” अशा शब्दांत जलील यांनी गायकवडांवर निशाणा साधला होता.
यावर आ.गायकवाड यांनीही कडक भाषेत आणि आपल्या स्टाईलमध्ये उत्तर देत म्हटले होते की, “इम्तियाज जलील म्हणतोय की, मी जर वेटरच्या जागी असतो तर मी त्यावेळी.. इम्तियाज जलील भाई तुम्ही त्या हॉटेलचं कंत्राट घ्या आणि मग ते खाऊ घालून दाखवा, त्याला तर दोनच बुक्के लागले, तुला तर असं मारेन.. असं मारेन की पुन्हा तू हॉटेल चालवायच्या लायकीचा राहणार नाहीस.”
जेव्हा याबाबत इम्तियाज जलील यांना पुन्हा पत्रकारांनी छेडले तेव्हा त्यांनी गायकवाडांना खुले चॅलेंज दिले आहे. ते म्हणाले की, आप मुझे धमकाने की बात कर रहें हैं, संजय गायकवाड साहब जगह आपकी.. वक्त आपका बताई कहाँ आना हैं.. आपको रहेम करने की जरूरत नही हैं मेरा आपसे कोई लेनादेना नही हैं लेकीन आप गलत हरकत कर रहे है ओ गरीब के लिए कोई आवाज उठाने के लिए नही हैं मुख्यमंत्री भीं हसते हसते जवाब दे रहे हैं तो इम्तियाज जलील भी गरीब ओ के लिए खडा रहेंगा.
आमदार संजय गायकवाड हे खुले चॅलेंज देण्यासाठी राज्यभर प्रसिध्द असतांना इम्तियाज जलील यांनी प्रकरणाला आणखी गरम केले आहे. जलील यांचे हे आव्हान आ. गायकवाड स्वीकारतात की, दुर्लक्ष करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत