बुलढाणा, 14 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने अपंग पुनर्वसन संस्था येथे मुलांना जेवण देण्यात आले. आज दिनांक 14 ऑगस्ट रोजी बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांचे सुपुत्र महाराष्ट्र राज्य युवासेना कार्यकारी सदस्य युवानेते मृत्युंजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने एक दिवस अगोदर शैलेश कुलकर्णी यांच्यावतीने बुलढाणा शहरातील अपंग पुनर्वसन संस्था येथे अंध, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांना भोजनाचे वाटप देण्यात आले, यावेळी त्या ठिकाणी संस्थेच्या वतीने युवानेते मृत्युंजय संजय गायकवाड यांचा विद्यार्थ्यांनी त्यांच्या हाताने बनवलेल्या पुष्पगुच्छाने तसेच ग्रीटिंग देऊन सत्कार केला.
अंध,अपंग व मूकबधिर तिन्ही शाखेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सांकेतिक भाषेमध्ये युवानेते मृत्युंजय गायकवाड यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्याने त्यांच्या हातून अविरत जनसेवा व्हावी याकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी त्या ठिकाणी शैलेश कुलकर्णी, वरुण कुलकर्णी, शिवसेना शहरप्रमुख गजेंद्र दांदडे, नगरपालिका माजी उपनगराध्यक्ष विजय जायभाये, सागवन सरपंच देवानंद दांडगे,सागर घट्टे, दादाराव लोखंडे, संस्थेचे उपाध्यक्ष जयसिंग जयवार, संस्थेचे उपाध्यक्ष अजय कारंजकर, विश्वस्त गजानन कुलकर्णी, गजानन बिबे, ज्ञानेश्वर खांडवे यांच्यासह अपंग पुनर्वसन संस्थेचे सर्व मुख्याध्यापक कर्मचारी वृंद, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.