spot_img

अखेर 14 किलोमीटर दूर आढळला जलसमाधी आंदोलनकर्त्याचा मृतदेह

बुलढाणा, 16 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः तब्बल 30 तासानंतर शोध आणि बचाव पथकास जलसमाधी आंदोलनकर्ता विनोद पवार याचा मृतदेह सापडला आहे. संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास पवारचा मृतदेह खाली गाळात फसलेला आढळला. आंदोलन स्थळापासून 14 किलोमीटर दूर धुपेश्वर नजीक पूर्णा नदीच्या पात्रात पवारला जलसमाधी मिळाली होती.
जिगाव प्रकल्पांच्या संदर्भात प्रशासनाच्या निषेधार्थ आणि आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी प्रकल्पानजिक पूर्णा नदीवर आडोळ खुर्द येथील गावकर्‍यांनी जलसमाधी आंदोलन केले. आडोळ खुर्द या गावाचा जिगाव प्रकल्पात पुनर्वसनाच्या पहिल्या टप्प्यात समावेश होता, मात्र अजूनही त्यांना जागा आणि जमिनीचा योग्य मोबदला मिळाला नसल्याने नागरिकांकडून हे आंदोलन करण्यात येत होतं. हे प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन करत असतानाच विनोद पवार (वय 45 वर्षे, रा. गौल खेड )याने पूर्णा नदी पात्रात उडी घेतली. पूर्णा दुथडी भरून वाहत असल्याने आणि वेगवान जलप्रवाहमुळे आंदोलक वाहून गेला. या घटनेने उपस्थित पोलीस, यंत्रणा आणि गावाकर्‍यात एकच खळबळ उडाली. याची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन देखील हादरले. बुलढाणा येथून जिल्हा शोध बचाव पथकाला अडोल खुर्द कडे रवाना करण्यात आले. दुपारपासून रात्री उशिरा पर्यंत बेपत्ता इसमाचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री अंधारा मुळे शोध मोहिम थांबविण्यात आली. आज शनिवारी सकाळ पासून खामगाव आणि नांदुरा येथील पथकाकडून बेपत्ता व्यक्तीचा शोध सुरू होता. दुपारी अकोला येथील पथक मदतीला पूर्णेच्या पात्रात उतरले. सामूहिक प्रयत्नांमधून शेवटी 14 किलोमीटर अंतरापर्यंत शोध मोहीम सुरू असताना पवारचा मृतदेह आढळून आला. विनोद पवारच्या जलसमाधी आंदोलनानंतर परिक्षेत्रामध्ये सर्वत्र शोक व्याप्त आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत