spot_img

रूईखेड टेकाळे ग्रामपंचायत मध्ये साहित्य खरेदीत ६ लाखांचा घोटाळा

सरपंच व सचिवांवर कारवाईचा इशारा

बुलढाणा, २१ ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : ग्रामपंचायत कुठलीही असो, पारदर्शी काम करणे कर्तव्य आहे. परंतु काही ग्रामपंचायत सरपंच, सचिव संगनमताने भ्रष्टाचार करतात.. असाच एक गैरप्रकारचा विषय रुईखेड टेकाळे येथे समोर आला. साहित्य खरेदीतील ६ लाखांच्यावर चा हा घोटाळा आहे.
रुईखेड टेकाळे येथील तत्कालीन सचिव आणि विद्यमान सरपंच यांनी ग्रामपंचायतीत फुकटचा लाभ घेऊन गावकऱ्यांना सुविधा न देता ६ लाखांच्यावर अनियमितता केल्यामुळे त्यांच्याकडून शासन वसुली करणार आहेत. याबाबत त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सचिव सविता सोनुने तर विद्यमान सरपंच जयश्री टेकाळे आहेत. यांनी रुईखेड टेकाळे येथे कार्यरत असताना, १५ व्या वित्त आयोगानुसार केलेल्या कामाचे साहित्य खरेदी केले होते. यामध्ये कचराकुंडी ३ लाख ३१ हजार ३००रूपये, पाणीपुरवठा साहित्य २ लाख ४३ हजार ८०० रूपये तसेच ब्लिचिंग पावडर व जीवन ड्रॉप ५० हजार रुपये अशा एकूण ६ लाख २५ हजार १०० रूपये या रकमेस वसुलीसाठी ते पात्र ठरणार असल्याची नोटीस जारी करण्यात आली आहे. विद्यमान सरपंच व तत्कालीन सचिव यांनी सदर रक्कम ग्रामपंचायत कार्यालयात भरावी, ७ दिवसाच्या आत रकमेचा भरणा न केल्यास महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार कारवाई करण्यात येईल असा इशारा बुलढाण्याच्या गटविकास अधिकारी यांनी दिला आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत