एलसीबीच्या पथकाची कारवाई
बुलढाणा, 22 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः सणासुदीच्या काळात गॅस सिलेंडरचा काळाबाजर केला जातो. त्याला रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. कारण घरगुती वापरण्यासाठीच्या गॅसचा वापर व्यावसायिक वापरसाठी होतांना दिसतो. कुठलेही नोंदणी न करता महागड्या किंमतीत हे सिलेंडर विकल्या जातात. त्याविरोधात पोलिस प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. सुलतानपुर येथे 115 घरगुती वापराचे भारत गॅस कंपनीेचे आणि एचपी कंपनीचे 56 गॅस सिलेंडर एलसीबीच्या पथकाने असे मिळून 171 सिलेंडर ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी 3,7 ईसी अॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी मेहकर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुलिन अंबुलकर यांच्या आदेशानुसार एएसआय राजकुमार राजपूत, हेकाँ गजानन दराडे, दिनेश बकाले, सतीश मुळे, वनिता शिंगणे, पोकाँ अरविंद बडगे, वैभव मगर, राहुल बोर्डे यांच्या पथकाने केली आहे.