बुलढाणा, 27 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा मोताळा महामार्गावर खडकी फाट्या नजीक एसटी महामंडळाच्या बसने 8 ते 10 मेंढ्या चिरडल्याची घटना घडली आहे. आज 27 ऑगस्ट रोजी खडकी फाट्याजवळ मेंढ्या रस्त्यावरून जात असताना भरधाव मलकापूर ते छत्रपती संभाजीनगर जाणार्या एसटी महामंडळाच्या बसने 8 ते 10 मेंढ्यांना चिरडल्याची घटना घडली आहे. या रोडवर रक्ताचा सडा पडल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मेंढपाळाचे लाखोचे नुकसान झाले आहे. याप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर बोराखेडी पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बोराखेडी पोलिस करीत आहे. सदर बातमी मध्ये आम्ही घटनेचा व्हीडिओ टाकला आहे.