spot_img

पत्रकार संदिप शुक्ला यांच्या घरी घरफोडी

चोरांचा रात्रभर धिंगाणा 

बुलढाणा, 29 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे जिल्हा प्रतिनिधी संदिप शुक्ला यांच्या घरी घरफोडी झाल्याची घटना घडली आहे. बुलढाणा शहरातील रहदारीचा भाग असलेल्या सर्क्युलर रोडवरील एस टू के ड्रेसेस समोर पत्रकर संदिप शुक्ला यांचे घर आहे. त्याठिकाणी आज 29 ऑगस्टच्या उत्तर रात्री काही चोरट्यांनी घरफोडी केली आहे. यामध्ये चोरट्या पैसे व दागिने शोधण्यासाठी सर्व घरातील सामान अस्थाव्यस्थ केले आहे. परंतू संदिप शुक्ला हे प्राईड येथील फ्लॅट मध्ये निवासाला असल्यामुळे त्याठिकाणी मौल्यवान वस्तू व पैसे मिळून न आल्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्रीचे पेेट्रोलिंग करण्याची आवश्यकता असल्याची मागणी काही सुज्ञ नागरिकांनी केली आहे. चोरीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार रवि राठोड यांनी तात्कळ पथकास पाचरण केले. याप्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस करीत आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत