spot_img

ज्या स्मशानात आईचा अंत्यविधी, त्या स्मशानात बांधले टिनशेड !

अंभोड्याच्या पवार बंधूंची सामाजिक संवेदनशीलता

बुलढाणा, 9 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः व्यक्तीच्या जन्माचं ठिकाण सांगता येत नाही पण प्रत्येकाच्या आयुष्याचा शेवटचा थांबा मात्र स्मशानभूमि आहे… ज्या ठिकाणी मृत्यूचा सोहळा असतो, त्याच ठिकाणी जर असुविधांचा गराडा असेल तर ! मृत्यूनंतरही अवहेलनाच का ! म्हणून प्रत्येक गांव-शहराची स्मशानभूमि सुंदर असली पाहीजे…तिथला परिसर नयनाभिरम्य असावा.. हा विचार खर्‍या अर्थाने प्रत्यक्ष रूपात रूजविला तो अंभोडावासियांनी ! गावच्या भूमिपुत्रांनी आणि बाहेरच्या दात्यांनी अंभोडा येथील स्मशानभूमिला ’देवभूमी’चे स्वरूप दिले आहे… गांवच्याच जीवन पवार आणि अ‍ॅड.मोहन पवार यांनी परवाच आईच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मशानभूमित 1000 स्क्वेर फूट असे मोठे टिनशेड बांधून दिले. अंभोडा हे गाव सामाजिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदायाची पाळंमुळं खोलवर रूजलेली आहे. अंभोडा गावात दोन दशकांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्याचप्रमाणे सामाजिकदृष्ट्या सुध्दा पुढारलेलं गाव म्हणून अंभोड्याची पंचक्रोशीत ओळख आहे. वाढदिवस, तेरवी, वर्ष श्राद्ध, जयंती व पुण्यतिथी निमित्त गावातील शाळा किंवा स्मशानभूमीसाठी मदत देण्याची एक अनोखी परंपरा अंभोडा गावाने जोपासली आहे. गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी एकत्र येत अडगळीत पडलेल्या स्मशानभूमीला स्वर्ग बनविण्याचे काम हाती घेतले. यामुळे स्मशानभूमीचा कायापालट होऊन स्मशानभूमी नव्हे तर देवभूमी बनली आहे. त्यामुळे अंभोडा गावाची ही बाब वाखाणण्याजोगी आहे. भाजपचे नेते अ‍ॅड.मोहन पवार व उद्योजक जीवन पवार यांच्या मातोश्री विमलबाई पवार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अंभोडा येथील स्मशानभूमीसाठी टीन शेड उभारुन दिले आहे. या टीन शेडचे लोकार्पण तेरवीच्या दिवशी करण्यात आले. त्यांच्या मातोश्रींचे अल्पश आजाराने 26 ऑगस्ट रोजी निधन झाले होते. त्यांच्या रक्षा विसर्जनाच्या दिवशी पवार बंधूंनी स्मशानभूमीमध्ये 1000 स्क्वेर फुटाचे टीन शेड बांधून देण्याचं निश्चित केले होते. तेरवीचा कार्यक्रम हा 7 सप्टेंबर रोजी होता. त्यापूर्वीच दोन्ही भावंडांनी 1000 स्क्वेर फुटाचे मजबूत असे टीन शेडचे बांधकाम पूर्ण केले. त्याचे लोकार्पण तेरवीच्या दिवशी ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शेलुदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धारेश्वर संस्थान घाटनांद्राचे शिवा महाराज बरडे, माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे, जेष्ठ भाजप नेते कडूबा पवार, गोल्डन मॅन राहुल सुरडकर तसेच अंभोडा येथील ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच आप्त परिवार मित्र मंडळी व नातेवाईक यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंभोड्याच्या स्मशानभूमीत आंब्याची 300 झाडे

माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांनी 150 सिमेंटचे बेंच दिले. गजानन पांडुरंग तायडे यांनी भोलेनाथ शंकराची मूर्ती बसवून दिली. कुलदीप शेनफड पवार यांनी स्वागत कमान बांधून दिली. विनोद भुसारी यांनी झाडांसाठी ठिबक बसवून दिले. शिवाजी कुटे यांनी 100 नारळाची झाडे दिली. सागर पवार यांनी 100 आंब्याची झाडे दिली. स्मशानभूमीत स्मशानभूमीत 300 आंब्याची झाडे आहे. तसेच गावकर्‍यांनी लोकवर्गणीतून स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम माँ जिजाऊ अर्बनचे उपाध्यक्ष शिवाजीराव तायडे यांच्या पुढाकरातून करण्यात आले. माजी सरपंच संदीप प्रभाकर तायडे यांनी वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ स्मशानभूमी मध्ये बोअर मारून देणार आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत