spot_img

लाचप्रकरण : मोताळा तहसीलदाराला दोन दिवसांची पोलीस कोठडी

बुलढाणा, 15 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : वर्ग दोनची जमीन वर्ग एक मध्ये करण्यासाठी तब्बल दोन लाख रुपयांची लाच घेणाऱ्या मोताळा तहसीलदार आरोपी हेमंत भागवत पाटील याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तहसीलदार पाटील याच्या घरात सापडलेले 4 लाख 75 हजार रुपये कुणाचे याविषयी त्यांच्या पत्नी किंवा त्याला स्वतःला सत्य स्पष्टीकरण देता आले नाही, हे महत्वाचे. सरकारी पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट व्ही. एल. भटकर यांचा युक्तिवाद प्रभावी ठरला.

ग्राम थड येथील एका शेतकऱ्याची वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये करून देण्यासाठी प्रत्येक एकर पन्नास हजार रुपये याप्रमाणे चार एकरचे दोन लाख रुपये द्यावे लागतील अशा हिशोबाने मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांनी शेतकऱ्याकडून लाच मागितली होती. त्यानंतर सदर शेतकऱ्याने अकोला अँटी करप्शन ब्युरोशी संपर्क साधला. मोताळा तहसीलदार पाटील लाच मागीत असल्याची अकोला एसीबीने पडताळणी केली. सदर शेतकऱ्याने बुलढाणा एसीबी केवळ 25 किलोमीटरवर असताना सुद्धा त्यांच्याशी संपर्क केला नाही. परंतु 125 किलोमीटर दूर अकोला अँटी करप्शन ब्युरो गाठले. तहसीलदार पाटील याला दोन लाख रुपये लाच देण्याचे ठरले. लाचेची हाव सुटलेल्या हेमंत पाटीलने शेतकऱ्याला लाचेची रक्कम घेऊन थेट बुलढाणा येथील घरीच बोलावले. अकोला एसीबीच्या पथकाने पाटील च्या घराभोवती सापळा रचला. दुपारी 2 वाजेच्या दरम्यान सदर शेतकरी लाचेची रक्कम घेऊन जसा घरात शिरला आणि तहसीलदार पाटील ने दोन लाख रुपयांची रक्कम स्वीकारली त्याच क्षणी सापळा रचून बसलेल्या पथकाने त्याच्यावर धाव घेतली. आपल्यावर रेड झाल्याचे लक्षात आल्यानंतर दुसऱ्याच क्षणाला तहसीलदार पाटील ने घराच्या शौचालयामध्ये लाचेची रक्कम फेकली. परंतु सतर्क असलेल्या पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ पंचा समक्ष ती रक्कम हस्तगत केली. आरोपी तहसीलदार हेमंत पाटील विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आज, सोमवारी आरोपी पाटील ला विशेष न्यायाधीश श्रीमती देशपांडे यांच्या कोर्टात उपस्थित करण्यात आले.

आरोपीचे वकील आणि जिल्हा सरकारी वकील श्री भटकर यांच्यात जोरदार युक्तिवाद झाला. लाच प्रकरणातील आरोपी पाटीलच्या घरात झाडाझडती दरम्यान 4 लाख 75 हजार रुपये नगदी राशी मिळून आली आहे. पाटीलच्या बायकोला किंवा घरच्या कुठल्याही सदस्याला सदर रकमेचा सत्य खुलासा करता आला नाही. सदर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. याशिवाय तहसीलदाराच्या व्यतिरिक्त आणखी कोणी आरोपी सदर प्रकरणांमध्ये सहभागी आहे का याची चौकशी होणे बाकी असल्याचे जिल्हा सरकारी वकिलांनी न्यायालयासमोर मांडले. सन 2020 मध्ये हेमंत पाटील बोदवडमध्ये लाच घेतांना पकडला गेला होता. हा आरोपी हॅबीच्युल आहे, याच्या मोबाईलमध्ये काही डेटा आहे का तसेच सदर जमिनीच्या प्रकरणातील दस्तावेजसुद्धा हस्तगत करणे बाकी असल्याचे जिल्हा सरकारी वकील ऍड. भटकर यांनी न्यायालयाला सांगितले. वरील युक्तिवादामुळे आरोपी पाटीलला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत