बुलढाणा, 16 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवसानिमित्त बुलढाणा आर्किटेक व इंजिनियर्स असोसिएशन तर्फे 15 सप्टेंबर रोजी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना अभिवादन करण्यात आले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित या कार्यक्रमाला असोसिएशनचे माजी अध्यक्ष नितीन राठोड, दिलदार पठाण, प्रकाश लहासे व इतर बुलढाणा शहरातील सर्व इंजिनियर्स आणि आर्किटेक बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमात अभियंता दिनाचे औचित्य साधून बुलढाणा शहरात स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रात काम करत असलेल्या रविराज राठोड, दीपक वैष्णव, वैभव लाड, आदित्य चौधरी, हार्दिक चौधरी व इतर सर्व अभियंत्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच बुलढाणा शहराची नवीन आर्किटेक व इंजिनियर्स असोसिएशनची कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यामध्ये अध्यक्ष पदी सुरेश चौधरी, उपाध्यक्ष रविराज राठोड, कोषाध्यक्ष पदी वैभव लाड, सचिव पदी संतोष लहासे, सहसचिव पदी दीपक वैष्णव यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.