बुलढाणा ग्रामीण पोलिसांची अवैध गुटख्याविरोधात धडाकेबाज कारवाई
बुलढाणा, 17 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने 5 लाख 21 हजार 170 रूपायांचा अवैध गुटखा जप्त केला आहे. बुलढाणा चिखली महामार्गावरील साखळी बु. फाटा येथे 15 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास अवैध गुटखा घेऊन जाणार्या वाहनातून 5 लाख 21 हजार 170 रूपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये आरोपी गजानन देविदास पेहरे रा. वरुड बु. ता. जाफ्राबाद व चालक सुनिल रामराव वाघ रा.अमोना ता. चिखली यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडील वाहनातून 45 पोतड्या प्रत्येक पोतडीमध्ये 25 नग राज निवास सुगंधित पान मसाला पाकीट असे एकुण किंमत 2 लाख 25 हजार रूपये, 5 पोतड्या प्रत्येक पोतडीमध्ये प्रीमियम आर एन जाफरानी जर्दा तंबाखु 225 पाकीटे किंमत 56 हजार 250 रुपये, 10 पांढर्या बॅग, प्रत्येक बॅगमध्ये 20 पाकीटे केसर युक्त विमल पान मसाला किंमत 94 हजार रूपये, पांढर्या रंगाच्या 2 पोतडयामध्य बिग तंबाखू 6 हजार रूपये, 10 पांढर्या पोतडीमध्ये केसर युक्त विमल पान मसाला किंमत 43 हजार 560 रुपये, 10 बॅग मध्ये तंबाखू किंमत 4 हजार 840 रुपये, खाकी रंगाचे 2 पोत्यामध्ये 8 पांढर्या रंगाच्या पोतड्या ज्यामध्ये केसर युक्त विमल पान मसाला 416 लहान आकाराची पाकीटे किंमत 77 हजार 792 रुपये, पांढर्या रंगाच्या 2 पोतडयामध्ये किंमत 13 हजार 728 रुपये असा एकुण सुगंधीत सुपारी व तंबाकुचा एकुण किंमत 5 लाख 21 हजार 170 रूपयाचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरचा माल वाहुन नेण्यासाठी वापरलेलं मालवाहू वाहन एमएच 28 बीबी 7025 किंमत 4 लाख 50 हजार रुपये असा एकुण 9 लाख 71 हजार 170 रुपयाचा मुद्देमाल मिळुन आला आहे. आरोपीं विरूध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार गजानन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सुरेश मोरे, पोहेकॉ. कैलास उगले, महादेव इंगळे, नारायण गावंडे, विकास सोनुने, पोकॉ.गजानन राजपूत, विष्णू गिते, ज्ञानेश्वर शेळके यांनी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पीएसआय सुरेश मोरे करीत आहे.