spot_img

आदिवासींकडून 6 ऑक्टोबरला आक्रोश मोर्चाची घोषणा

– घुसखोरी विरोधात आदिवासींनी आवळली वज्रमुठ

बुलडाणा: मूळ आदिवासींचे प्रश्न प्रलंबित असतांना आता आदिवासींच्या आरक्षणावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप करीत जिल्ह्यातील आदिवासी सकल समाजाने बैठक घेत मोर्चाची घोषणा केली आहे. बुलढाण्यात सोमवार, 6 ऑक्टोबर 2025 रोजी संभाव्य घुसखोरी विरोधात ‌‘आक्रोश मोर्चा‌’ काढण्यात येणार असून आदिवासी आरक्षण बचाव मागणीसह इतरही मागण्या सरकारसमोर सदर मोर्चाद्वारे मांडल्या जातील. गुड इव्हिनिंग सिटीला प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या प्रेसनोटमध्ये आदिवासी समाजनेत्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात मागिल अनेक वर्षापासून आदिवासी समाजामध्ये गैर आदिवासी समाजाचे आरक्षण मिळावं म्हणून आंदोलन, मोर्चे चालू आसून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करून आरक्षण देण्याची मागणी हैदराबाद गॅझेटनुसार केली आहे, त्याच अनुषंगाने हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊन बंजारा व इतर समाजाने सुद्धा आदिवासी समाजात समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी करण्यासाठी जोर धरला आहे दरम्यान या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सकल आदिवासी समाजाची विश्राम भवन बुलढाणा येथे 17 सप्टेंबर रोजी बैठक संपन्न झाली, यावेळी मूळ आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन दिनांक 6 ऑक्टोबर 25 रोजी सर्वानुमते ठरले आहे, यावेळी एक तिर एक कमान सर्व आदिवासी एक समानचा नारा देत 6 ऑक्टोबर रोजी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11:30 वाजता एकलव्य महाराज चौक गांधी भवन जवळ या ठिकाणावरून आयोजन करण्याचे ठरले आहे करण्यात चे ठरले आहे. त्याचं बरोबर 12500 अतिरिक्त झालेल्या ठिकाणी आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांची नोकर भरती करावी यासह अनेक मागण्यासाठी करण्यात मोर्चा काढण्याचे ठरले आहे.यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील सकल आदिवासी समाजाचे सामाजिक कारकर्ते विविध आदिवासी संघटनेचे पदअधिकारी तसेच आजी माजी जि. प. प.स. सदस्य या बैठकीस मोठ्या संख्येने हजर होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत