spot_img

रेशनकार्डधारकांच्या समस्या सोडविण्यासाठी ॲड.सुनिल देशमुख आक्रमक 

बुलडाणा, 24 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : भाजप नेते ॲड.सुनिल देशमुख यांनी मासरुळ सर्कल मधील रेशनकार्ड धारकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे समस्या सोडविण्याची मागणी केली आहे. गुम्मी येथील जवळपास 80 लोकांचे रेशनकार्डधारक ज्यांना राशन मिळत नाही. तसेच शेतकरी लाभार्थ्यांना सुद्धा रेशन चे पैसे मिळत नाही. यासाठी ॲड. सुनील देशमुख सदस्य सल्लागार समिती भारतीय खाद्य महामंडळ,भारत सरकार (FCI)तथा संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी , तसेच तहसील पुरवठा अधिकारी मॅडम यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता. पुढील काही दिवसात आपले रेशनकार्ड चालू होईल अशी शाश्वती जिल्हा पुरवठा अधिकारी, तसेच तहसीलदार यांनी दिली. मासरुळ जिल्हा परिषद सर्कल मधील ज्या पात्र लाभार्थ्यांना रेशन संदर्भात काही अडचणी असतील त्यांनी सेवा संपर्क कार्यालय भाजपा बुलढाणा यांच्याशी 8805903333 या क्रमांकावर संपर्क करावा असे आव्हान करण्यात आले. यावेळी गुम्मी गावातील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल नरोटे, पंडित नरोटे, पंजाब नरोटे, नामदेव नरोटे, रामदास नरोटे, आदी उपस्थित होते.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत