spot_img

बापरे..! महिन्याला पाच खून 

जिल्ह्यात चाललंय तरी काय ? ; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
बुलढाणा, 25 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) :   शांतताप्रिय आणि विविधतेने नटलेल्या बुलढाणा जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत खुनाच्या घटना समोर येत आहे. मंगळवारी रात्री उशिरा खामगाव पोलीस स्टेशन हद्दीत आणि त्यापूर्वी बुलढाणा शहर हद्दीत घडलेल्या चित्तथरारक ‘मर्डर’ ने जिल्हा हादरला आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत एकूण ४० खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे. यामुळे, सुव्यस्थेची घडी विस्कटल्याचे गंभीर चित्र निर्माण झाले आहे.
  बुलढाणा जिल्ह्यासाठी २०२५ हे वर्ष वाढत्या गुन्हेगारीचे ठरत आहे. विशेष म्हणजे शांतता प्रिय शहर अशी ओळख असलेल्या बुलढाण्यात गेल्या दीड महिन्यात दोन चाकू हल्ले झालेत. यामध्ये १ ऑगस्टरोजी चिखली रोडवर सनी जाधव नामक युवकाचा मृत्यू झाला होता. या घटनेला दीड महिने उलटत नाही तोच, पुन्हा शहरातील बसस्थानक मागील एका भोजनालयात शुभम राऊत नावाच्या युवकाला क्षुल्लक कारणाने भोसकले जाते. यामुळे, वाढती गुन्हेगारी पाहता ‘सुसंस्कृत’ बुलढाणा शहर गुन्हेगारीच्या विळख्यात तर सापडत नाही ना? असा काळजीवजा प्रश्न सुज्ञ नागरिक उपस्थित करीत आहेत. दुसरीकडे बुलढाणा शहरातील ही घटना ताजी असतानाच, खामगाव येथील एका हॉटेलात एका प्रियकराने प्रेयसीची हत्या केली आणि स्वतःलाही संपविले. यामुळे, सतत कानावर येणाऱ्या खुनाच्या घटनांनी जिल्हा हादरला आहे.
 बुलढाणा उपविभागात ‘क्राईम’ वाढला..
जिल्ह्यात जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान एकूण ४० खून झाल्याची नोंद पोलीस दलातील वाचक कक्षात करण्यात आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीनुसार मलकापूर, खामगाव हे उपविभाग अति संवेदनशील आहेत. मात्र, यंदा बुलढाणा उपविभागात सर्वाधिक १४ खुनांच्या घटनांची नोंद झाली आहे.
 ३९ प्रकरणांचा उलगडा..
एकूण ४० खून प्रकरणापैकी ३९ प्रकरणांचा यशस्वीरित्या उलगडा करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या एका खुन प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती वाचक शाखेचे प्रमुख, पोलीस अधिकारी ढोमने यांनी दिली.
 उप विभागनिहाय प्रकरणे..
बुलढाणा -१४
मेहकर-३
देऊळगाव राजा- ६
खामगाव- ८
मलकापूर- ९
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत