spot_img

ना. संजय सावकारें वर ‘त्या’ फोटोवरून टीकेची झोड

बुलढाणा, 26 सप्टेंबर (गुड इव्हिनिंग सिटी): राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे हे बुलढाणा जिल्हाच्या दौऱ्यावर आहेत. काल २५ सप्टेंबर रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हणा, देवखेड, सायंदेव, वर्दडी या गावांन भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. नुकसानग्रस्त भागांची पहाणी करत संबधीत अधिकाऱ्यांकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली. त्यानंतर जगप्रसिध्द लोणार सरोवर बघण्यासाठी गेले. जगविख्यात लोणार सरोवराचे सौंदर्य पाहून अनेकांना फोटो काढण्याचा मोह राहवत नाही. त्यामुळे ना. सावकारे यांना ही फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह बुलढाणा जिल्ह्यातील सर्व शेतकरी हे पावसामुळे त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिके व घर वाहून गेली आहे. जिल्ह्यातील शेतकरी हा संकटात असतांना जिल्ह्याचे सहपालकमंत्री सावकारे यांनी धीर देण्याऐवजी मजाक उडवत असल्याचे ना. सावकारे यांनी हसत हसत काढलेल्या फोटो वरून दिसून येत आहे. शिवसेना जिल्हाप्रमख जालिंदर बुधवत यांनी टीका करतांना म्हटले आहे की, शेतकऱ्यांची दख सोडून पिकनिकसाठी गेले ही लाजीरवाणी बाब आहे. बुलढाणा जिल्ह्याचे शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात आहे. जिल्ह्याला दोन पालकमंत्री असुन त्यांनी शेतकऱ्यांची दुःख समजून घेऊ शकले नाही. शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नाही.
तर भाजप सर्मथकांचे म्हणे आहे की, ना. संजय सावकारे यांनी नुकसानग्रस्त भागाची पहाणी करून सायंकाळी ते लोणार सरोवर बघण्यासाठी गेले. तेथे गेल्यानंतर प्रत्येक व्यक्ती हा फोटो काढतो त्यामुळे ना. सावकारे यांनी फोटो काढल त्या गैर नसल्याचे म्हटले आहे.
परंतु या फोटोमुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याचे सध्या तरी दिसून येत आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत