spot_img

जल जीवन मिशनच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात ?

चार महिन्यांपासून मानधन थकीत

बुलढाणा, 12 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः दिवाळी सण पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे. नागरिकांची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. सर्वत्र बाजारपेठा फुलल्या आहे. पण जिल्हा परिषद मधील जल जीवन मिशन कर्माचार्‍यांचे चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. जिल्हा परिषदमधील जल जीवन मिशन अंतर्गत कार्यरत जिल्हा सल्लागार , तालुका स्तरावरील गट संसाधन केंद्रातील गट व समूह समन्वयक कर्मचारी, डेटा एन्ट्री ऑपरेटर आणि इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील चार महिन्यांपासून मानधन थकीत आहे. परिणामी, आठ दिवसावर दिवाळी सण आला असताना या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
    राज्यातील सर्व जिल्ह्यात हे सर्व कर्मचारी जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) या केंद्र पुरस्कृत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सातत्याने काम करीत आहेत.मात्र जुलै २०२५ पासून आजपर्यंतचे मानधन मिळालेले नाही, त्यामुळे आर्थिक संकटात भर पडली आहे.एकीकडे शासनाने दिवाळी सणाच्या अगोदर सर्व कर्मचारी यांचे वेतन देण्याचे परिपत्रक काढले आहे पण राज्य पाणी व स्वच्छता मिशनने मात्र या निर्णयाला निधी उपलब्ध नाही हे कारण देऊन शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.याचे आश्यर्य व्यक्त केले जात आहे.
   याबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्ही वेळोवेळी राज्य पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाशी संपर्क साधला असता, केंद्र सरकारकडून निधी प्राप्त झालेला नाही म्हणून मानधन देणे शक्य नाही,” अशी मोघम उत्तरे मिळत आहेत.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी प्रत्येक जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तसेच राज्याच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव यांना निवेदने सादर करून मानधन तातडीने मंजूर करण्याची मागणी करीत आहे.
    या कर्मचाऱ्यांचे वेळेवर मानधन मिळाले नाही ऐन दिवाळी सणाच्या काळात आमची घरे अंधारात राहणार आहेत.जिल्हा व तालुकास्तरावर काम करणारे हे कर्मचारी अत्यल्प मानधनावर काम करतात.या मानधनातूनच घरगुती खर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्यावरील खर्च भागवावा लागतो.त्यामुळे सध्या त्यांच्यावर प्रचंड मानसिक ताण निर्माण झाला आहे.सदर कर्मचाऱ्यांनी शासनाकडे मागणी केली आहे की, या विषयाकडे संवेदनशीलतेने पाहून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा.त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल आणि त्यांना दिवाळी सण आनंदात साजरा करता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत