राज्य सरकार सोबत आज बैठक
बुलढाणा, 13 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) : एस टी कामगारांचे मागील कालावधी मधील थकीत वेतन फरक व विविध भत्ते त्यांचा फरक मिळवून घेण्यासाठी संयुक्त कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलनाची नोटीस एसटी प्रशासनाला दिली आहे. यासाठी सर्व संघटनांची एक दिलाने आंदोलनाची तयारी सुरू असून बुलढाणा विभागांमध्ये गठीत झालेल्या सर्व संघटना युक्त कृती समितीच्या वतीने आंदोलनाची रणनीती आखण्याच्या हिशोबाने बुलढाणा विभागातील सर्वात मोठा डेपो असलेल्या मेहकर येथून श्री शारंगधर बालाजीला प्रचार प्रसार दौऱ्याचा नारळ फोडण्यात आला.
व संपूर्ण जिल्ह्याचा यावेळी दौरा करून प्रसार करण्यात आला.
एप्रिल 2020 पासून 6500 रु वेतनवाढ चा व महागाई भत्यासह इतर भत्ते चा फरक ची रक्कम जवळपास 4400 कोटी रु कामगारांना देणे बाकी आहेत. शासनाने मान्य करून ही थकबाकी अद्याप न दिल्याने एस टी कामगार मध्ये असंतोष आहे. ही थकीत रक्कम मिळावी व एस टी महामंडळ मध्ये खासगीकरण रोखण्यासाठी ही धरणे आंदोलन नोटीस देण्यात आलेली आहे. या संयुक्त कृती समिती मध्ये प्रामुख्याने कामगार संघटना, इंटक संघटना , कामगार सेना, काष्ट्राईब संघटना, बहुजन परिवहन संघटना, कर्मचारी काँग्रेस संघटना ,शिव परिवहन वाहतूक सेना,महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन,महाराष्ट परिवहन मजदूर युनियन व इतर सर्व संघटना सामील असून
त्यांच्या वतीने वतीने राजेंद्र पवार, मनोज पाटील,प्रमोद सनगाळे , गजानन माने ,संदीप पाचपोर ,विजय पवार ,संजय उबरहंडे विकास तिवारी, महादेव दिवनाले, अविनाश वेंडोले, किशोर जाधव, प्रताप वानखडे, अशोक दाभाडे, राजाराम गवई, , दीपक मिसाळकर, सतीश गोंधळी, भिकाजी मेढे,सचिन खिर्डेकर, सोहन भालेराव, रत्नदीप हिवाळे,प्रवीण बुंधे अमरजित जाधव, आशिष लकडे,प्रदीप सरकटे यांच्या स्वाक्षरी आहे.
आंदोलन बाबतीत आणि कामगार वर्गाच्या विविध प्रश्नांवर आगार शासनाने दिवाळी च्या मुहूर्तावर तोडगा काढावा आणि सण अग्रीम रक्कम व दिवाळी भेट रक्कम देण्यात यावी असासूर कामगार वर्गामधून आहे.
या धरणे आंदोलनामध्ये बुलढाणा विभागातील सर्व आगारातील बहुसंख्य यांत्रिक ,प्रशासकीय, चालक ,वाहक व अधिकारी सहभागी होणार आहेत. एकूणच थकीत थकबाकी रक्कम मिळण्याच्या या आंदोलनाला यशस्वी करण्याचा मानस
महाराष्ट्र संयुक्त कृती समिती तर्फे करण्यात आला आहे.