– बुलढाणा पोलिसांची कारवाईबुलढाणा, १५ ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः गांजा व्यापाराचे हब बनलेल्या बुलढाण्याला नशेपासून मुक्त बनविण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांनी मिशन परिवर्तन सुरु केले आहे. त्यांच्या या प्रयत्नांना पुढे घेवून जाण्यासाठी बुलढाणा शहर पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहे. काल, १४ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजेदरम्यान गांजा तस्करी करणार्या एकाला जेरबंद केले आहे. बुलढाणा ते मलकापूर मार्गावरील एका चहाच्या हॉटेलजवळ बाबु पंडीत जाधव या आरोपीला रंगेहाथ पकडण्यात आले. जवळपास दोन किलो गांजा घेवून बाबु जाधव गांजा तस्करीसाठी जात होता. आरोपी बाबु जाधव (वय ४३) हा भडेच ले-आऊट मध्ये राहतो. त्याच्याकडून अँड्राईड मोबाईल आणि हिरो कंपनीची सुपर स्प्लेन्डर मोटरसायकल जप्त करण्यात आली. आरोपीविरोधात अपराध क्रमांक ९२३/२५ कलम ८ (क), २० (व) २ (ब) गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापाररावर परिणाम करणारा पदार्थ अधिनियम १९८५ (एनडीपीएस ऍक्ट) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक निलेश तांबे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, एलसिबी प्रमुख श्री अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात शहर ठाणेदार रवि राठोड, सपोनि जयसिंग राजपुत, पीएसआय रवि मोरे, पोहेकॉ संतोष वाघ, पोहेकॉ सुनिल जाधव, पोहेकॉ संदीप कायदे, नापोकॉ संतोष साखळीकर, पोकों विशाल बनकर, पोकॉ मनाज सानुने, पोकों विनोद बारे, पोकॉ राम डोळे, नितीन चव्हाण यांच्या पथकाने केली आहे.