spot_img

मुलीचा विनयभंग करणाऱ्यास अद्दल घडविली.. न्यायालयाने 3 वर्षे शिक्षा ठोठावली !

बुलढाणा, 15 ऑक्टोबर (गुड इव्हिनिंग सिटी) ः घरात रंग देण्याच्या कामासाठी आलेल्या तरूणाने ‌‘बेढंग‌’ चाळे केल्याचा प्रकार चार वर्षांआधी चिखली शहरात घडला होता. किन्होळा वाडी येथील प्रशांत काळे या आरोपीने घरातील एका खोलीत एकटी असलेल्या अल्पवयीन मुलीला गाठून तिला जबर्दस्तीने मिठी मारली होती. विशेष न्यायालयाने सदर प्रकरणात महत्वपूर्ण निकाल देतांना मुलीचा विनयभंग करणाऱ्या प्रशांत काळेला अद्दल घडविली असून त्याला पोक्सो कायद्यानुसार तीन वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा विशेष सरकारी वकील ॲड. वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद करुन आरोपीविरुध्द दोष सिध्द केले.
सविस्तर वृत्त अशा प्रकारे आहे की, घटना ही चिखली, ता. चिखली जि. बुलडाणा येथील असुन 2021 मध्ये 30 सप्टेंबर आरोपी प्रशांत विश्वनाथ काळे (वय 26) व त्याचा एक साथीदार हे पिडितेच्या घराचे कलरिंगचे काम करीत होते, त्या वेळेस पिडितेचे वडील हे त्यांच्या दुकानावर गेलेले होते, तर पिडितेची आई व 2 बहिणी ह्या घरी हजर होत्या. असे असतांना दुपारी अंदाजे 1.00 वाजताच्या दरम्यान पिडिता ही तिच्या दोन बहिणीसह बेडरुम मध्ये अभ्यास करीत होती, एवढ्यात पिडितेच्या मोठ्या बहिणीला भूक लागल्यामुळे ती किचन मध्ये जेवण करण्यासाठी गेली होती तर पिडितेची आई किचनमध्ये स्वयंपाक करीत होती व पिडिता व तिची लहान बहिण ही बेडरुम मध्ये अभ्यास करीत होत्या तर, आरोपी प्रशांत व त्याचा एक साथीदार हे घराच्या गॅलरीमध्ये कलरिंगचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी याने सदर बेडरुम मध्ये वाईट उद्देशाने प्रवेश करुन पिडितेच्या लहान बहिणीला तहान लागली म्हणून पाणी आणावयास पाठविले, पिडितेची लहान बहिण पाणी आणण्याकरीता किचनमध्ये गेली असता पिडिता ही एकटी असल्याचे पाहून आरोपी प्रशांत काळे याने वाईट उद्देशाने पिडितेचे हात जबरदस्तीने पकडले व दोन्ही हातांनी तिला मिठी मारली व म्हणाला की, तु मला खुप आवडते त्यामुळे पिडिता एकदम घाबरुन जावून तिने आरोपीच्या हाताला झटका दिला व ओरडली. परंतु, “तु जर ओरडली तर, तुला जिवाने मारुन टाकील\” अशी धमकी आरोपीने पिडितेस दिली. परंतु सुदैवाने तात्काळ पिडितेची आई, मोठी बहिण, लहान बहिण किचन मधुन धावत आले त्यामुळे आरोपी संधी साधून तातडीने घरातून पडून गेला. त्यानंतर पिडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या आई व दोन्ही बहिणींना सांगितला त्यानंतर पिडितेच्या आईने पिडितेच्या वडीलांना दुकानावरुन बोलावून घेतले व अवघ्या 10 ते 15 मिनिटात पिडितेचे वडील घरी आले व त्यांनी त्याच दिवशी म्हणजेच दि. 30 सप्टेंबर 2021 रोजी घडलेल्या घटनेची तक्रार पो.स्टे. चिखली येथे दिली होती.
सदर तक्रारी नुसार आरोपी विरुध्द भा.दं.वि चे कलम 354, 354 अ, 506 व पोक्सो ॲक्ट चे कलम 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व गुन्हा दाखल झाल्यानंतर तपासअधिकारी यांनी आरोपीस तात्काळ अटक करुन तपासादरम्यान घटनास्थळ पंचनामा केला, पिडितेचे जन्म प्रमाणपत्र, व वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केले, महत्त्वाच्या साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविले व पिडितेचे सी.आर.पी.सी चे कलम 164 नुसार बयान नोंदवून घेतले व एकंदरीत तपासाअंती आरोपीविरुध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने विशेष न्यायालय, बुलडाणा येथे वरील गुन्ह्यानुसार दोषारोप पत्र दाखल केले.
आरोपी विरुध्द दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर भा.दं.वि चे कलम 354, 354 अ, 506 व पोक्सो ॲक्ट चे कलम 12 नुसार आरोपीविरुध्द वि. न्यायालयात दोषारोप ठेवण्यात आले होते त्यानंतर प्ररकण पुराव्यासाठी लागल्यानंतर सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी आरोपीविरुध्द सदर गुन्हा सिध्द होण्याच्या हेतुने एकूण 10 साक्षीदार तपासले त्यामध्ये पिडिता, पिडितेचे आई-वडिल, दोन्ही बहिणी यांची साक्ष नोंदविण्यात आली तर घटनास्थळ पंच व तपासअधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली व पिडितेचे वय 14 वर्षे असल्यामुळे पिडितेचे वय सिध्द होण्याचे दृष्टीकोनातून पिडितेचे जन्म नोंदीबाबत साक्षीदार क्रमांक 10 तपासण्यात आले व पिडितेचे वय जन्म नोंदी नुसार सिध्द करण्यात आले. तर, आरोपी विरुध्द पोक्सो ॲक्टचे कलम 8 नुसार सुद्धा गुन्हा सिध्द होत असल्यामुळे सरकारी वकीलांनी सी.आर.पी.सी चे कलम 216 नुसार अर्ज करुन कलम 8 समाविष्ट करुन दोषारोप ठेवण्याची विनंती केली. सदरची विनंती न्यायालयाने मंजुर करुन आरोपी विरुध्द पोक्सो ॲक्टचे कलम 8 नुसार सुद्धा दोषारोप ठेवण्यात आल. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या सर्व साक्षीदारांनी सरकार पक्षास मदत केली. आरोपीने घटनेच्या दिवशी वाईट उद्देशाने पिडितेचा विनयभंग करुन तिच्यावर पोक्सो ॲक्ट चे कलम 8 व 12 नुसारं लैंगिक अत्याचार केला ही बाब वि. न्यायालयासमोर सिध्द झाली असल्यामुळे विशेष न्यायाधीश श्रीमती. एम.व्ही. देशपांडे यांनी आरोपीस पोक्सो ॲक्ट चे कलम 8 नुसार 3 वर्षे सश्रम कारावास व रु. 2 हजार दंड तर कलम 12 नुसार 1 वर्षे सश्रम कारावास व रु. एक हजार दंड व भा.दं. विचे कलम 506 नुसार 1 वर्षे सश्रम कारावास व रु. एक हजार दंड अशा प्रकारे शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे. तर, एकूण रु. 4 हजार दंडापैकी नुकसानभरपाई रक्कम रु. 2 हजार पिडितेला देण्याचा आदेश वि. विशेष न्यायालयाने केलेला आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील तथा विशेष सरकारी वकील वसंत लक्ष्मण भटकर यांनी प्रभावी युक्तीवाद करुन आरोपीविरुध्द दोष सिध्द केले तर सदर प्रकरणाचा सक्षम तपास तपासअधिकारी पोउपनि, सचिन राजपाल चव्हाण व सपोनि, प्रविण तळी यांनी केला होता तर, कोर्ट पैरवी पो.हे. कॉ. नंदाराम इंगळे यांनी खटल्यादरम्यान मदत केली.

 

 

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत